Facebook SDK


ऑनलाइन फॉर्म: महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023:Maharashtra Solar Pump Yojana 2023.


ऑनलाइन फॉर्म: महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023: Maharashtra Solar Pump Yojana 2023

सौरऊर्जेला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरू केली आहे. यायोजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सौरपंप उपलब्ध करून देण्यात येणार असून जुन्या इलेक्ट्रिक आणि डिझेलवर चालणाऱ्या पंपांचे सौर पंपामध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत महाराष्ट्र शासनाने सौर पंप संच उभारण्यासाठी ९५% अनुदान दिले आहे. याचा अर्थ लाभार्थ्याकडून फक्त 5% रक्कम दिली जाईल.


राज्यातील शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरावी, शाश्वत व्हावी तसेच राज्यातील शेतकरी संपन्न आणि सुखी व्हावा असे महाराष्ट्र शासनाचे उद्दिष्ट आहे, यासाठी महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना, धोरणे नियोजनबद्ध पद्धतीने राबवीत असते, याच धोरणाचा अवलंब करून शेततळे योजना, सौर कृषी पंप योजना या सारख्या योजना शासन राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून या योजनांची अंमलबजावणी करत आहे. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप आस्थापित करण्याची योजना जाहीर केली आहे, सौर उर्जा हा उर्जेचा शाश्वत आणि अखंड स्त्रोत आहे, भारतासारख्या देशामध्ये आठ महिने कडक उन असते, त्यामुळे निसर्गाकडून मिळालेल्या या निरंतर उर्जेच्या स्त्रोताचा वापर सौर कृषी पंपच्या माध्यमातून वापरून शेतीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायद्याचा ठरू शकतो.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेंतर्गत पुढील 3 वर्षांत 1,00,000 कृषी पंप बसविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. राज्यातील इच्छुक लाभार्थी ज्यांना मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेंतर्गत त्यांच्या शेतात सौरपंप बसवायचा आहे, त्यांनी या योजनेत अर्ज करायचा आहे. या लेखात आम्ही तुम्हाला महाराष्ट्र सौर पंप योजनेशी संबंधित सर्व माहिती देणार आहोत, त्यामुळे हा लेख पूर्ण वाचा.


महाराष्ट्र सौर पंप योजनेचे उद्दिष्ट:

महाराष्ट्र शासनामार्फत ही योजना राबविण्याचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सिंचनासाठी पुरेशी वीज उपलब्ध करून देणे आणि शेतीवरील खर्च कमी करणे हा आहे. या महाराष्ट्र सौर पंप योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सौरपंप बसवण्यासाठी 90 टक्के पर्यंत अनुदान दिले जात आहे. महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना या योजनेची अंमलबजावणी शासनाव्दारे राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केली आहे, तसेच शेतकरी वापरत असलेले पारंपारिक विजेवर चालणारे कृषी पंपांना पुरवठा होत असलेल्या विद्युत पुरवठ्यामध्ये वारंवार बिघाड होऊन वीज पुरवठा खंडित होणे, तांत्रिक वीज हानी वाढणे, रोहोत्र बिघाड होण्यामध्ये वाढ, विद्युत अपघात, विद्युत चोरी या सारख्या समस्यांमुळे अखंडित शाश्वत विद्युत पुरवठा होण्यास अडचणी निर्माण होतात, या शिवाय जिथे विद्युत पुरवठा उपलब्ध नाही अशा ठिकाणी शेतकरी डिझेल इंधनाचा वापर करून कृषी पंप चालवितात जे त्यांना डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे अत्यंत महागात पडते, पर्यायाने या सर्व समस्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होते, याला पर्याय म्हणजे सौर कृषी पंप राज्यातील शेतकऱ्यांना सौर कृषी पंप उपलब्ध करून दिल्यास वरील सर्व समस्यांवर मात करता येऊ शकते. यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 मोठ्याप्रमाणात राबविण्याचा शासनाचा विचार आहे.

Also Read: पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना 2023 | PM Scholarship Scheme 2023


महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचे फायदे आणि वैशिष्ट्ये:(mukhyamantri sour krushi pump yojana)

महाराष्ट्र राज्यात अटल सौर कृषीपंप ( atal sour krushi pump)योजना राबविण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयासमवेत राज्य शासनाव्दारे राज्यात एक लाख सौर कृषीपंप आस्थापित करण्यासाठी विभागाच्या अर्थसंकल्पीय तरतूद अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती लाभार्थ्यांकरिता विशेषघटक योजना / आदिवासी उपयोजनांतर्गत निधीचा वापर करून नवीन सौर कृषी पंप योजना करण्यास मान्यता दिली आहे. शेतकऱ्याला दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे त्याचप्रमाणे राज्य शासनाची पारंपरिक पद्धतीने कृषिपंप जोडणीसाठी लागणाऱ्या खर्चात आणि राज्य शासनाव्दारे सबसिडीपोटी देण्यात येणाऱ्या अनुदानात बचत करण्याचे उद्दिष्ट साध्य व्हावे याकरिता राज्यातील शेतकऱ्यांना कृषी सिंचनासाठी एक लाख सौर कृषी पंप टप्प्या टप्प्यात उपलब्ध करून देण्याचा शासनाचा उद्देश आहे.

 

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना (Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana 2023

हि संपूर्णपणे महाराष्ट्र शासनाची योजना आहे, या योजनेच्या अंतर्गत पुढील तीन वर्षाच्या कालावधीत टप्प्या टप्प्याने एक लाख सौर कृषीपंप आस्थापित करण्याचा शासनाचा उद्देश आहे. या योजनेच्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात 25000 सौर कृषी पंप, दुसऱ्या टप्प्यात 50000 सौर कृषी पंप आणि तिसऱ्या टप्प्यात 25000 सौर कृषी पंप आस्थापित करण्याचे उद्देष्ट ठरले आहे. या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक टप्पा प्रत्यक्ष सुरु झाल्यापासून अठरा महिन्यात राबविण्यात येईल.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत महाराष्ट्र सरकार सौर कृषी पंपाच्या किंमतीच्या 95 टक्के अनुदान देणार आहे आणि यामध्ये लाभार्थ्यांना 5 टक्के रक्कम भरावयाची आहे.या योजने अंतर्गत 5 एकरपर्यंत शेतजमीन असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना 3 HP पंप देण्यात येतील आणि 5 एकर पेक्षा अधिक शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना 5 HP आणि 7.5 HP पंप देण्यात येतील.मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनेचं अंतर्गत राज्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल.


महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी आवश्यक पात्रता:

महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना 2023 मोठ्याप्रमाणात राबविण्यात येणार आहे त्यामुळे या योजनेसाठी शासनाने लाभार्थ्यांसाठी पात्रता निकष ठरवून दिलेले आहे, शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी हे पात्रता निकष माहित असणे आवश्यक आहे, या योजनेचे पात्रता निकष खालीलप्रमाणे असतील

 

मुख्यमंत्री सौर कृषी पंप (mukhyamantri solar pump yojana maharashtra)योजनेचा लाभ मिळविण्यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध आहे, असे सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील, परंतु या शेतकऱ्यांकडे पारंपारिक पद्धतीने विद्युत कनेक्शन नसणे आवशयक आहे.

या योजने अंतर्गत पाच एकरापर्यंत शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना तीन HP सौर कृषी पंप आणि पाच एकरांपेक्षा जास्त शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना पाच HP सौर कृषी पंप देण्यात येतील.

या योजनेच्या अंतर्गत राज्यातील पारंपारिक पद्धतीने विद्युत कनेक्शन नसलेले शेतकरी तसेच विद्युतीकरणासाठी वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसलेले शेतकरी, महावितरण कंपनीकडे विद्युत कनेक्शनसाठी पैसे भरूनही प्रलंबित असणाऱ्या शेतकऱ्यांपैकी, ज्यांना नजीकच्या काळात विद्युत कनेक्शन मिळणे शक्य नाही असे शेतकरी, अतिदुर्गम भागातील शेतकरी, महाराष्ट्र शासनाच्या धडक सिंचन योजने अंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी यांना सदर योजने अंतर्गत प्राधान्य राहील.

वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, बारमाही वाहणारी नदी किंवा नाले यांच्या शेजारी शेतजमीन  असणारे शेतकरी सुद्धा या योजनेसाठी पात्र असतील.

योजनेच्या अंतर्गत सौर कृषी पंपांसाठी सर्वसाधारण गटांच्या लाभार्थ्यांकडून 10 टक्के आणि अनुसूचित जातीच्या अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकडून 5 टक्के याप्रकारे लाभार्थी हिस्सा म्हणून भरणे आवश्यक असेल.

Also Read: शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना 2023 | farmers government scheme 2023

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना 3 HP आणि 5 HP सोलर पंपांसाठी लाभार्थी पात्रता :

शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्त्रोत असलेली शेतजमीन असणे आवश्यक आहे.

पारंपारिक पद्धतीने कृषि पंपांकरिता विद्युत जोडणी झालेले शेतकरी.

पाच एकरापर्यंत शेतजमीन धारकास 3 HP सौर कृषीपंप 5 एकरापेक्षा जास्त शेतजमीन धारकास 5 HP आणि 7.5 HP सौर कृषिपंप देय राहील.

यापूर्वी शासनाच्या कुठल्याही योजनेव्दारे कृषी पंपांचा लाभ घेतलेले शेतकरी

अतिदुर्गम आदिवासी भागातील शेतकऱ्यास प्रधान्य.

वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याने अद्याप विद्युतीकरण झालेल्या गावातील शेतकरी.

धडक सिंचन योजना अंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी.

महावितरणाकडे विद्युत कनेक्शनसाठी पैसे भरून प्रलंबित असलेले शेतकरी अर्जदार.


मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना 7.5 HP सोलर पंपांसाठी लाभार्थी पात्रता

विहीर किंवा कुपनलिका यापैकी जलस्त्रोत असणे आवश्यक आहे.

अद्यावत भूजल अंदाज अहवालानुसार अतिशोषित, शोषित, आणि अंशतः शोषित गावांमधील विहिरींमध्ये कूपनलिकांमध्ये नवीन सौर कृषीपंप अनुज्ञेय असणार नाही.

अद्यावत भूजल अंदाज अहवालानुसार ज्या सुरक्षित पाणलोट क्षेत्रांची उपसाची स्थिती 60 टक्के पेक्षा कमी आहे, अशा क्षेत्रातील गावांमधील विहिरींमध्ये कूपनलिकांमध्ये नवीन सौर पंप देण्यात येतील.

खडकाळ क्षेत्रांमध्ये खोदल्या जाणाऱ्या बोरवेल विहिरी हे सिंचनाचे शाश्वत साधन नसल्याने बोरवेल विहिरींमध्ये नवीन सौर पंप देणे अनुज्ञेय असणार नाही. परंतु गाळाच्या क्षेत्रांमध्ये खोदल्या जाणाऱ्या कुपनलिका हे शाश्वत सिंचनाचे साधन असल्यामुळे सुरक्षित क्षेत्रांमध्ये कूपनलिकांमध्ये नवीन सौर पंप देण्यात येतील.

कोणत्याही वर्गवारीतील क्षेत्रांमध्ये 60 मीटर पेक्षा जास्त खोल असलेल्या विहिरींमध्ये अथवा कूपनलिकेमध्ये नवीन सौर पंप देण्यात येणार नाही.


Also Read: free solar rooftop yojana 2023| मोफत सोलर रूफटॉप योजना 2023


महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :(kusum soalr pump important documents)

या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी योजनेमध्ये अर्ज करणे आवश्यक आहे, त्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी खालीलप्रमाणे राहील.

अर्जदाराचे आधार कार्ड

* शेतीचे कागदपत्र

* मूळ निवासाचे प्रमाणपत्र

* बँक पासबुक

* मोबाईल नंबर

* ओळख पत्र

* पासपोर्ट साईज फोटो

* 7 / 12 उतारा


मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना 2023 ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया :(kusum mahaurja.com login)

या योजनेच्या अंतर्गत लाभ मिळविण्यासाठी ऑनलाइन https://www.mahadiscom.in/solar/index.html या वेबसाईटवर जाऊन अर्ज करणे आवश्यक आहे, या योजनेमध्ये ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.

महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना अंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम राज्यातील महावितरणच्या आधिकारिक वेबसाईटवर भेट द्यावी लागेल

यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होम पेज उघडेल या होम पेजवर तुम्हाला Beneficiary Services हा पर्याय दिसेल, यावर क्लिक करावे लागेल

त्यानंतर दिलेल्या पर्यायांमधून ‘’Apply Online’’ या पर्यायावर क्लिक करा, यानंतर तुमच्यासमोर ‘’New Consumer’’ हा पर्याय दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल

या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल या पेजवर एक नवीन अर्ज उघडेल.

या अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हला भरायची आहे या प्रमाणे :-

Paid Pending AG Connection Consumer Details:

शेतकऱ्याने जर विद्युत कनेक्शनसाठी पैसे भरून अद्यापही वीज जोडणी झाली नसे तर त्या विषयी माहिती भरावी.

Details of Applicant and Location:

त्यानंतर अर्जदाराने आधार कार्ड प्रमाणे संपूर्ण माहिती आणि जागेचा तपशील भरावा 

Nearest MSEDCL Consumer Number:

तुम्हाला यानंतर ज्या शेतजमिनीवर सौर पंप बसविण्याचा आहे त्या शेतीबद्दल संपूर्ण माहिती भरावी लागेल. तसेच तुम्हाला जवळचा महावितरण ग्राहक क्रमांक द्यावा लागेल.

Details of Applicant Residential Address and Location:

या नंतर तुम्हाला तुमच्या घराचा संपूर्ण पत्ता आणि ठिकाणाबद्दल माहिती भरावी लागेल

वरीलप्रमाणे संपूर्ण माहिती तुम्हाला भरावयाची आहे.

आता यानंतर अर्जामध्ये मागितलेले सर्व कागदपत्रे तुम्हाला अपलोड करावी लागेल, त्यानंतर संपूर्ण माहिती भरल्यानंतर पुन्हा एकदा संपूर्ण पडताळणी करा.

यानंतर सबमिट बटनावर क्लिक करून अर्ज सबमिट करा, या प्रकारे तुमची योजनेमध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.


मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना अर्ज स्थिती तपासणे :(sour Krushi pump yajna application verification)

तुम्ही महावितरणच्या अधिकृतवेबसाईटवर जाऊन तुमच्या अर्जाची स्थिती खालीलप्रमाणे तपासू शकता

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेच्या अंतर्गत केलेल्या अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला महावितरणच्या आधिकारिक वेबसाईटवर जावे लागेल.

तुमच्यासमोर उघडलेल्या मुखपृष्टावर तुम्हाला ‘’लाभार्थी सेवा’’ हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

आता तुम्हाला दिलेल्या पर्यायांमधून ‘’Track Application Status’’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल, आता या नवीन पेजवर तुम्हाला अर्जाची स्थिती पाहण्यासाठी ‘’लाभार्थी आयडी’’ भरावा लागेल.

यानंतर तुम्हाला सर्च या पर्यायावर क्लिक करावे लागेल, या पर्यायावर क्लिक केल्यावर आपल्यासमोर संबंधित अर्जाची स्थिती दिसेल.


शेतकऱ्यांसाठी शेती हा फायदेशीर व्यवसाय व्हावा, शेती हि शाश्वत व्हावी आणि पर्यायाने शेतकरी संपन्न व्हावा या साठी शासनाकडून विविध प्रकारच्या योजना राबविल्या जात आहे, याचे पुढील पाऊल म्हणजे शासनाव्दारे शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेली मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना या योजनेमुळे जिथे वीज उपलब्ध नाही अशा अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांना शेती सिंचन करणे सुलभ होणार आहे, तसेच डिझेल पंपामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान कमी होण्यास मदत होईल. अपारंपरिक उर्जास्त्रोतांमध्ये सौरउर्जा हि शाश्वत आणि निरंतर आहे. पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने, वातावरणातील प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचे नुकसान कमी होऊन त्यांचे उत्पन्न वाढावे या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेच्या माध्यमातून एक लाख सौर कृषीपंप उपलब्ध करून देण्याचे लक्ष निर्धारित केले आहे. वाचक मित्रहो या लेखामध्ये आपण मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहिली आहे, तरीही या योजनेविषयी आपल्याला आणखी काही माहिती जाणून घ्यायची असल्यास खाली दिलेल्या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधून माहिती मिळवू शकता. हि पोस्ट आपल्याला आवडली असेल तर आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवू शकता.


#pm kusum yojana, #sour pump yojna, 

#kusum mahaurja.com solar beneficiary registration,

#kusum mahaurja.com login,

#mukhyamantri sour krushi pumpm yojna 2023 form appliacation,

#kusum sour pump yojna,

#kusum mahaurja solar register.com

#Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana 2023 Registration

#Atal sour krushi pump,beneficiary.login

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने