Facebook SDK

हवामान विभागाने दिला वादळी पावसाचा इशारा! Todays weather report !

हवामान विभागाने दिला वादळी पावसाचा इशारा! Todays weather report !



बऱ्याच न्यूज च्या माध्यमातून तसेच अभ्यासकांच्या माध्यमातून मान्सून बद्दल

बातम्या दिल्या जात आहेतबऱ्याच वेब पोर्टल वर मान्सून आलामान्सून 

डकलाया भागात मुसळधार पाऊसत्या भागात गारपीटवादळाची 

शक्यता हे सांगितले जात आहे.



कमाल तापमानात वाढ झाल्याने विदर्भ अक्षरशः भाजून निघत आहे. उर्वरित राज्यातही उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. यातच पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामानामुळे आज (ता. ९) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजा मेघगर्जनेसह, वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.विदर्भात अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ४३ अंशाच्या वर सरकला आहे. विदर्भासह राज्यातही उष्ण व दमट हवामान असह्य ठरत आहे. गुरुवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील चंद्रपूर आणि गोंदिया येथे राज्यातील उच्चांकी ४३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर वर्धा, गडचिरोली, बुलडाणा, ब्रह्मपुरी येथे तापमान ४३ अंशावर होते. उर्वरित राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३५ ते ४२ अंशांच्या दरम्यान होते.पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात म्यानमार किनाऱ्याजवळ समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत.‘बिपॉरजॉय’ चक्रीवादळाची तीव्रता कायम
अरबी समुद्राच्या पूर्व-मध्य भागात असलेले 'बिपॉरजॉय' अतितीव्र चक्री वादळ उत्तरेकडे सरकत आहे. या वादळाची तीव्रता कायम आहे. गुरुवारी (ता.८) ही प्रणाली गोव्यापासून ८५० किलोमीटर नैर्ऋत्येकडे, मुंबईपासून ९०० किलोमीटर नैर्ऋत्येकडे तर गुजरातच्या पोरबंदरपासून ९३० किलोमीटर दक्षिणेकडे होती.
ही प्रणाली उत्तर आणि वायव्य दिशेकडे सरकण्याचे संकेत आहेत. वादळामुळे समुद्र खवळून उंच लाटा उसळण्याची, तसेच किनारपट्टीलगत ताशी ४० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असून, आज (ता. ९) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार वारे, विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Also Read :काय आहे मान्सूनची स्थिती ? | mansoon update 2023 !

गुरुवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :
पुणे ३७.४ (२३.६), जळगाव ४१.५ (२१.०), धुळे ३९.० (-), कोल्हापूर ३५.६ (२७.५), महाबळेश्वर २९.९ (१८.५), नाशिक ३६.१ (२३.२),
निफाड ३८.१ (२४.८), सांगली ३६.६ (२४.२), सातारा ३७.८ (२३.७), सोलापूर ४०.६ (२५.६), सांताक्रूझ ३४.६ (२८.६), डहाणू ३५.४ (२८.०), रत्नागिरी ३४.५ (२७.०),
छत्रपती संभाजीनगर ३९.८ (२३.८), नांदेड ४०.८ (२९.२), परभणी ४१.३ (२८.७), अकोला ४२.३ (२९.९), अमरावती ४१.०(२४.३), बुलडाणा ४३.२ (२६.४), ब्रह्मपुरी ४३.२ (२६.४),
चंद्रपूर ४३.८(२८.२), गडचिरोली ४३.४ (२७.२), गोंदिया ४३.८ (२५.४), नागपूर ४१.० (२५.५), वर्धा ४३.५(२८.०), वाशीम ४१.६(२६.८) यवतमाळ ४१.५ (२५.५).

Also Read: पंजाब डख शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आला मान्सून!(punjab dakh hawaman andaz)


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने