Facebook SDK

मान्सून हा शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या प्रयत्नात आहे की चिंता वाढवणारा ? | mansoon update 2023 !

काय आहे मान्सूनची स्थिती ? | mansoon update 2023 !

नमस्कार शेतकरी मित्रांनो, मान्सून जवळ येतोय, शेतकऱ्यांची खते बी-बियाणांची खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे, अशा परिस्थितीत काही भागांमध्ये पाऊस पडतोय. आणि हा पाऊस पडत असताना येणारा पावसाळा किंवा मान्सून हा शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या प्रयत्नात आहे, की चिंता वाढवणारा याबाबत आपण आज माहिती घेणार आहोत.



मान्सून अपडेट 2023 :- mansoon update !

 बऱ्याच न्यूज च्या माध्यमातून तसेच अभ्यासकांच्या माध्यमातून मान्सून बद्दल बातम्या दिल्या जात आहेत. बऱ्याच वेब पोर्टल वर मान्सून आला, मान्सून धडकला, या भागात मुसळधार पाऊस, त्या भागात गारपीट, वादळाची शक्यता हे सांगितले जात आहे.

Also read :- (punjab dakh hawaman andaz)


मान्सूनपूर्व पाऊस:- mansoon in maharashtra !

मान्सूनपूर्व पाऊस हा काही भागात पडत असून अशा परिस्थितीत शेतकरी हा गोंधळला आहे. काही भागात पेरण्या होऊ शकतातअशा परिस्थितीमध्ये 2023 चा हा जो खरीप हंगाम असेल या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांसमोर असणारे मोठे संकट म्हणजे दुबार पेरणी. कारण ज्या पद्धतीने आता वातावरण निर्मिती केली जाते या पद्धतीने शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण होऊ लागलाआहे. अशावेळी काही शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्या तर मात्र शेतकऱ्यांना मोठा फटका बसू शकतो. वातावरणाची जी परिस्थिती आहेयासंदर्भात आय एम बी च्या माध्यमातून, स्कायमेट च्या माध्यमातूनअभ्यासकहवामान विशारद हे वेळोवेळी  माहिती देत आहेत. 

परंतु बऱ्याच मोठ्या प्रमाणात न्यूज चॅनेल हे जे ब्रेकिंग न्यूज देतात त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.

 Also read :- पिक विमा नोंदणी करा एक रुपयात;crop insurance@1 rs.

 

सायकलोनिक अलर्ट :- mansoon alert!

एकंदरीत आपण पाहिले तर काल म्हणजे दिनांक 4 जून रोजी मान्सूनपूर्व पावसाने बऱ्याच भागात हजेरी लावलीकाल सकाळी साडे दहा पासून आय एम डी च्या माध्यमातून अलर्ट जारी करण्यात आला होता. अशाप्रकारे सायकलोनिक किंवा आपण याला धुळीचे वादळ म्हणू शकतो. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ शकते असे अलर्ट देण्यात आले होते. त्या पद्धतीने काल सकाळी दहा वाजल्यापासून धुळीचे वादळ पालघर मधून नाशिक, धुळे,नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, अहमदनगर, धाराशिव, बीड, पुणे, सातारा, नांदेड, हिंगोली पर्यंत  पोहोचले. काही भागात प्रमाणात पाऊस झाला तर काही भागात वादळी वाऱ्याचा फटका बसला. धाराशिवलातूरच्या काही भागात चांगला पाऊस झाला तर काही ठिकाणी हवेचा फटका मोठ्या प्रमाणात बसला.

Also read :- कुसुम सोलर पंप योजना 2023 | वेबसाईट काही काळासाठी बंद ! कधी होणार चालू 


मान्सून बद्दल समज आणि गैरसमज:-mansoon news!

बऱ्याच लोकांचे गैरसमज झाले आहेत, आता मृगनक्षत्र आले आणि पावसाळा सुरू झाला. जून मध्ये जो पाऊस होतो तो म्हणजे  मान्सून आला असा शेतकऱ्यांचा समज होतो. पण हा पूर्णपणे अवकाळी पाऊस आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार  येथे  काही भागात तसेच  नाशिक, मालेगाव किंवा अहमदनगर असेल ,रायगड, पालघर, पुणे, हडपसर आणि हवेली तालुक्यात साधारण 20-25  मिली पाऊस झाला. गैरसमज होऊ देता फक्त आणि फक्त हा अवकाळी पाऊस आहे. धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, परभणी, जालना हा जो एक पट्टा आहे या पट्ट्यात आज दुपारनंतर पाऊस होऊ शकतो परंतु हा अवकाळी पाऊस असून उद्यापासून म्हणजे जून 6,7,8,9,10 यापुढे साधारणतः कोरड्या हवामानाची  शक्यता आहे.

Also read :-फळपीक विमा योजना 2023 साठी अर्ज सुरू | fal pik vima yojna 2023


मान्सूनचे आगमन कधी आणि केव्हा:-mansoon 2023 !

IMB आणि स्कायमेट च्या माध्यमातून  सांगण्यात आले की, मान्सून उशिरा पोहोचू शकतो. भारतीय हवामान विभागातून मान्सून 4 जून  पर्यंत केरळ mansoon in kerala मध्ये दाखल होईल असे सांगण्यात आले होते. तसेच  स्कायमेट  च्या माध्यमातून मान्सून हा सात जून पर्यंत दाखल होईल असे सांगण्यात आले. अंदमान निकोबार बेटावर मान्सून पोहोचला असला तरी तेथून मान्सूनची  पुढील वाटचाल मंद गतीने होणार आहे. साधारणत मान्सून हा 7-8  जून रोजी केरळात दाखल होईल. काही बदल झाले तर मान्सूनचे आगमन उशिरा ही होऊ  शकते असे भाकीत करण्यात आले आहे.

Also read :-पंजाब डख शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आला मान्सून!(punjab dakh hawaman)


महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन:- mansoon 2023 maharashtra !

केरळ mansoon in kerala 2023 मध्ये मान्सून 7-8  जून ला दाखल होत असला तरी तो महाराष्ट्रात उशिरा दाखल होऊ शकतो. याचे कारण म्हणजे केरळच्या पश्चिम भागात एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, त्यामुळे चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे महाराष्ट्राकडे   येणाऱ्या मान्सूनच्या प्रवासात अडथळा निर्माण झाला आहेसध्याची परिस्थिती पाहता  साधारणतः 14 जून पर्यंत मान्सून महाराष्ट्रात सक्रिय होईल अशी शक्यता आहेपरंतु  केरळ, कोकण किनारपट्टी येथे जरी मान्सून धडकला असला तरी तो पेरणी योग्य पाऊस हा महाराष्ट्रात यायला कालावधी आहे.

चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीनुसार पाऊस जरी पडला असला तरी तो पेरणी योग्य नाही त्यामुळे पाऊस चांगला झाला, पेरणीयोग्य झाला असा गैरसमज होऊ देऊ नका. आज सुद्धा बऱ्याच भागात पाऊस होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पूर्व मशागतीच्या कामात अडथळा येईल. एकंदरीत 17 जून किंवा 23 जून नंतरच होणारा पाऊस हा खरं मान्सूनचा पाऊस असेल. सध्या होणारा पाऊस हा अवकाळी पाऊस असल्यामुळे नुकसानदायक पाऊस असू शकतो  जो की शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा आहे.

यासाठी शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन करून घ्यावे. पेरणी करताना कोणत्याही अफवेला बळी पडू नका. कृषी विभागाच्या माध्यमातून आव्हान केले जात नाही तोपर्यंत पेरणी करू नका आणि दुबार पेरणीचे संकट टाळा.

Also read :-पंजाब डख शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आला मान्सून!(punjab dakh hawaman)




#mansoon,#mansoon update,#mansoon2023,#mansoon in maharashtra,#mansoon in kerala,#punjab dakh hawaman,

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने