Facebook SDK

  पिक विमा नोंदणी करा एक रुपयात;1 rs pik vim

पिक विमा नोंदणी करा एक रुपयात


महाराष्ट्राचा 2023- 24 चा अर्थसंकल्प जाहीर झाला आहे. अपेक्षेप्रमाणेच शेतकऱ्यांसाठी सरकार तर्फे मोठी घोषणा करण्यात आली आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांना पिक विमा योजनेमध्ये केवळ एक रुपया भरून सहभागी होता येणार आहे.


            दिवसेंदिवस पीक विम्याचा हप्ता वाढत चालला होता. वाढलेल्या हत्यामुळे शेतकऱ्यांचं मोठे नुकसान होत होतं. शेतकऱ्यांच्या शेतीच्या वाढलेल्या हत्यामुळे  बहुसंख्य शेतकरी पिक विमा भरू शकत  नव्हते. एखाद्या वर्षी दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टी यांसारखे संकट आले की, शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होतं  असे . या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकारच्या 2023- 24 या बजेटमध्ये शासनाच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ज्याच्या मध्ये आता शेतकऱ्याला एक रुपया मध्ये या पीक विमा योजनेमध्ये सहभागी होता येणार आहे.



राज्यात सर्वसमावेशक पिक विमा (pikvima) योजना राबविणार:

         विम्याचा उर्वरित रकमेचा हप्ता राज्य सरकार भरणार आहे. आधीच्या योजनेत विमा  हप्त्याच्या  दोन टक्के रक्कम शेतकऱ्यांकडून घेतली जात होती. त्यामध्ये बदल करून शेतकऱ्यावर भार पडू नये म्हणून राज्य सरकार विम्याचा भार उचलणार आहे. त्यासाठी राज्याच्या सरकारी तिजोरी वरती जवळपास 3312 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. ते राज्य सरकार केवळ शेतकऱ्यांसाठी उचलणार आहे. आजूबाजूच्या राज्यांमध्ये जसे की गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश सरकार ज्याप्रमाणे योजना राबवते त्या पार्श्वभूमी वरती महाराष्ट्र सरकारने योजना राबवावी अशी बऱ्याच वर्षापासून मागणी होती. 2022 मध्ये यावर महाराष्ट्र शासनाने अभ्यास केला पण कुठल्याही प्रकार चा याच्यामध्ये दिलासा देण्यात आला नव्हता. बीड पॅटर्न चा प्रायोगिक तत्वावर वापर करण्यात आला. परंतु शेतकऱ्यांना याच्यामध्ये कुठलाही दिलासा मिळाला नव्हता. अखेर आता शेतकऱ्यांना या पिक विमा च्या हत्या पासून मुक्ती मिळाली आहे. एक रुपयाच्या हप्त्यामध्ये येणाऱ्या हंगामापासून शेतकऱ्यांना पिक विमा योजनेमध्ये सहभागी होता येणार आहे.

           घोषणा झाल्यानंतर बऱ्याच दिवसाचा कालावधी लोटलेला होता. एक रुपयात पिक विमा योजना (EK RUPAYAT PIK VIMA YOJANA) हि राबवली जाणार का? असे बरेच प्रश्न  शेतकऱ्यांना पडले होते. एक रुपया पिक विमा योजनेसंदर्भात महत्वाची अशी मंजुरी बाकी होती, ती म्हणजे मंत्रिमंडळाची मंजुरी.


PM Kisan Bima Yojana|पीएम किसान विमा योजना:

              शेतकरी बांधवांनो, 30 मे 2023 रोजी महत्वाची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय झाले.  जे की शेतकऱ्याच्या  हितसंबंधी  घेण्यात आले. ज्यामध्ये की, शेतकऱ्यांसाठी जी पिक विमा योजना राबवली जाते   त्या विमा योजनेमध्ये  आता एक रुपयाचा हप्ता नाम मात्र  शुल्क  भरून पीक विमा योजनेमध्ये सहभागी होता येणार आहे. शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत एक रुपयांमध्ये पिक विमा शेतकऱ्यांसाठी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित करण्यात आलेला आहे.

             या योजनेला कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाल्यामुळे लवकरच त्याचा जीआर निर्गमित केला जाईल. GR मध्ये  सविस्तर माहिती  मिळेल. जीआर आल्यानंतर आपल्याला आमच्या www.onlinekrishi.com या वेबसाईटच्या द्वारे कळवण्यात येईल.

              तरी माझ्या शेतकरी बांधवांना मोठी सुखद आणि दिलासा दायक बातमी आम्ही या वेबसाईटच्या द्वारे  दिली. यासंबंधी नवीन अपडेट आल्यावर   आपल्याला कळवण्यात येईल.

GR मध्ये  सविस्तर माहिती:


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने