Facebook SDK

 

फळपीक विमा योजना 2023 साठी  अर्ज सुरू| falpik vima yojana 2023


फळपीक विमा 2023 योजना साठी  अर्ज सुरू

फळपीक विमा 2023 योजना: PM fal pik vima yojna 2023


कृषी क्षेत्राच्या उत्पादनवाढीच्या दरामध्ये फळपिकांचा प्रमुख सहभाग आहे. फळपिकांचे बाजार मूल्य अधिक असल्याने शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. मात्र फळपिकांचे उत्पन्न न आल्यास येणारा तोटाही मोठा असतो. ही बाब विचारात घेऊन शेतकऱ्यांच्या फळ पिकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांना आर्थिक स्थिती अबाधित राहण्याच्या दृष्टीने मदत होईल. त्यासाठी राज्यात प्राधान्याने फळपीक विमा योजना राबविण्यात येते.


नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास संरक्षण देणारी ही योजना असून. 26 जिल्ह्यामधील फळपिकांच्या हवामानाच्या धोक्यांच्या निकषानुसार राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री फळ पीक योजना कर्जदार, तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी ऐच्छिक आहे.

फळपिक विमा योजना | 2023 (fal pik vima yojna 2023):


मृग बहरातील राज्याच्या 26 जिल्ह्यामधील फळबागांना फळपिक विमा pik vima योजना 2023 हवामान आधारित विमा योजना लागू करण्यात आली आहे. या फळपिक विमा योजनेमध्ये एक लाख ते दीड लाख च्या आसपास फळ उत्पादक शेतकरी सहभागी होण्याची शक्यता आहे.कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी व्हायचे नसल्यास तसे घोषणापत्र योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या 7 दिवस अगोदर बँकेला देणे आवश्यक आहे. जेणेकरून बँक विमा हप्ता परस्पर कपात करणार नाही. जे कर्जदार शेतकरी विहित मुदतीत सहभागी न होण्यासाठी बँकांना कळविणार नाहीत, असे शेतकरी योजनेत सहभागी आहेत. असे गृहित धरण्यात येईल व या शेतकऱ्यांचा विमा हप्ता विहित पद्धतीने कर्ज खात्यातून वजा करण्यात येईल.

केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे . त्यापेक्षा कमी वयाच्या फळबागा लागवडीस विमा संरक्षणाची नोंद झाल्याचे पडताळणीत निदर्शनास आल्यास विमा संरक्षण संपुष्टात येईल.

पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गतच राबविली जाते. डाळिंब, पेरू, लिंबू, संत्रा, मोसंबी, चिकू, सिताफळ व द्राक्ष फळ पिके या योजनेत आहे. ही फळपिक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना इच्छित आहे.


Also read:- पिक विमा नोंदणी करा एक रुपयात;crop insurance@1 rs.


प्रधानमंत्री फळ पीक योजना 2023: (fal pik vima yojna maharashtra)

अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळपिके घेणारे (कुळाने / भाडे पट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी) या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकासाठी मृग व आंबिया बहार मिळून जास्तीत जास्त 4 हेक्टर क्षेत्र मयदिपर्यंत विमा नोंदणी करण्याची मुभा आहे.

Also read:- कुसुम सोलर पंप योजना 2023 | वेबसाईट काही काळासाठी बंद ! कधी होणार चालू ?


फळपीक विमा योजना 2023 मुदत ( pik vima 2023 last date )

संत्रा, द्राक्ष, पेरू आणि लिंबू यासाठी मुदत 14 जून

मोसंबी व चिकू साठी मुदत 30 जून पर्यंत

आणि डाळिंबाला 14 जुलै पर्यंत मुदत

र सीताफळासाठी 31 जुलैपर्यंत अर्ज भरता येतील, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.


आवश्यक कागदपत्रे :- (pm falpikvima documents)


1) आधार कार्ड

2) शिधापत्रिका

3) बँक खाते

4) आधार कार्ड

5) तुम्ही जमीन भाड्याने घेतली असल्यास शेतमालकाशी केलेल्या कराराची छायाप्रत

6) शेती खाते क्रमांक

7) शेतकऱ्याचा फोटो

8) शेतकऱ्याने फळे रोपण सुरू केल्याची तारीख


ऑनलाईन अर्ज कसा कराल ? (PM FAL PIK VIMA APPLICATION):


जर तुम्ही वर दिलेले पात्रता निकष पूर्ण केले, तर तुम्ही खाली दिलेल्या सोप्या टिप्सद्वारे फळपीक विमा योजना : 2023 अंतर्गत अर्ज करू शकता…

सर्वप्रथम तुम्हाला पीएम फसल विमा योजनेच्या https://pmfby.gov.in/ अधिकृत वेबसाइटवर जावं लागेल.

फळपीक विमा योजना योजनेत नोंदणी करण्यासाठी, तुम्ही प्रथम तुमचे स्वतःचे अकाउंट तयार केलं पाहिजे.

अकाउंट तयार करण्यासाठी, रजिस्ट्रेशन https://pmfby.gov.in/selfRegistration वर क्लिक करा आणि विचारलेले सर्व डिटेल्स योग्यरित्या भरा.

सर्व डिटेल्स प्रविष्ट केल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा, याद्वारे तुमचे खाते अधिकृत वेबसाइटवर तयार केलं जाईल.

अकाउंट तयार केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये Login करून पीक विमा योजनेसाठी फॉर्म भरावा लागेल.

पीक विमा योजनेचा फॉर्म योग्यरित्या भरल्यानंतर, तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल, त्यानंतर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर Successful असा मॅसेज प्राप्त होईल…


टीप : हा अर्ज तुम्ही जवळच्या CSC / आपले सेवा केंद्रावरही करू शकता. त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही हा अर्ज लवकरात लवकर करायला हवा.


Also read:- लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2023| Lek Ladki Yojana


फळपीक विमा 2023 साठी जिल्हानिहाय विमा कंपन्या अशा....



  • * अमरावती, वाशिम, नाशिक, नगर, धुळे, यवतमाळ, सोलापूर, पालघर, नागपूर जिल्हा: रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी( टोल फ्री क्रमांक- 18001024088)
  • * छत्रपती संभाजी नगर, सांगली, बीड ,अकोला, ठाणे, वर्धा, सातारा, हिंगोली, परभणी, जालना, लातूर, कोल्हापूर जिल्हा: एचडीएफसी ऍग्रो जनरल इन्शुरन्स
  • ( टोल फ्री क्रमांक -18002660700)
  • * धाराशिव, नांदेड, पुणे, बुलढाणा, जळगाव जिल्हा: भारतीय कृषी विमा कंपनी
  • ( संपर्क क्रमांक -18004195004)

Also read:-पंजाब डख शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आला मान्सून!



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने