Facebook SDK


महाराष्ट्र बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी, नूतनीकरण व अर्ज प्रशिक्षण !
Maharashtra bandhkam kamgar registration and online appication detail's


महाराष्ट्र बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी, नूतनीकरण व अर्ज प्रशिक्षण




या लेखात Maharashtra bandhkam kamgar yojna 2023 बांधकाम कामगार योजना काय आहे, या योजनेसाठी पात्रता आणि अटी काय आहेत, बांधकाम कामगार योजनेचे फायदे कोणते आहेत, योजना कोणासाठी राबवली जात आहे, अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत.



 याची अर्ज प्रक्रिया काय आहे, बांधकाम कामगार योजनेचे फॉर्म कुठे मिळतील या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या लेखामध्ये मिळणार आहेत. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा. या योजनेचा लाभ हा ग्रामीण आणि शहरी कामगार बांधवांना घेता येणार आहे. बांधकाम कामगार नोंदणी (bandhkam kamgar nondani)  सुरु झाली आहे. तरी इच्छुक आणि पात्र लाभार्त्यांनी योजनेच्या लाभाचा अवश्य लाभ घ्यावा. महाराष्ट्र सरकार राज्यातील नागरिकांसाठी आणि समाजातील विविध घटकांसाठी नेहमीच विविध प्रकारच्या योजना राबवीत असते, या धोरणाचा अवलंब करून महाराष्ट्र शासन राज्यातील असंघटित कामगार तसेच समाजातील कामगार गट, या प्रमाणे बांधकाम आणि इतर बांधकाम कामगार हा राज्यातील सर्वात मोठा असंघटित विभाग आहे.
 रोजगार आणि सेवेच्या शर्तीचे नियमन करण्यासाठी आणि याचप्रमाणे बांधकाम आणि इतर बांधकाम कामगारांसाठी सुरक्षा आरोग्य आणि कामगारांसाठी कल्याणकारी योजना उपाय प्रदान करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाना कडून महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्यात आले, या कामगार कल्याण मंडळाच्या अंतर्गत इमारत आणि इतर बांधकाम कामगार Maharashtra Construction Worker अशा प्रकारच्या कामांमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी विविध प्रकारच्या योजना राबऊन तसेच विविध प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमांच्या अंतर्गत कामगारांना आरोग्य शैक्षणिक तसेच आर्थिक लाभ देऊन कामगारांचे जीवनमान सुधारणे त्यांच्या जीवनाचा दर्जा उंचावणे महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न आहे.


महाराष्ट्र ईमारत  इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ 

kamgar kalyan yojana 2023 maharashtra )

महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार मंडळ, हे मंडळ महाराष्ट्र सरकारच्या अधिपत्याखाली असलेले मंडळ आहे, या मंडळाची स्थापना महाराष्ट्र शासनाने इमारत आणि इतर बांधकाम [रोजगार नियमन आणि सेवा शर्ती] कलम 60 आणि कलम 40 या कलमांच्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार रोजगार नियमन आणि सेवा शर्ती नियम, 2007 तयार केले आहेत. 1 मे 2011 रोजी महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापनेला मान्यता देण्यात आली.

 राज्यातील कामगारांच्या संपूर्ण विकासासाठी हे मंडळ काम करते, बांधकाम कामगार कल्याण उपकर अधिनियमाच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सर्व इमारत आणि बांधकाम आस्थापनांकडून जमिनीचे मूल्य वगळून बांधकामाच्या एकूण खर्चाच्या 1 % दराने उपकर. वसूल केला आणि उपकराची रक्कम महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे जमा केल्या जातो, या निधीतून हे मंडळ कामगारांच्या विकासासाठी तसेच कामगारांच्या कुटुंबियांसाठी कल्याणकारी योजना राबवीत असते. महाराष्ट्र शासनाने इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळचे एक ऑनलाइन पोर्टल सुरु केले आहे त्यामुळे कल्याणकारी मंडळाव्दारे कामगारांसाठी राबविल्या जात असलेल्या विविध सेवा आणि योजनांचा लाभ सुलभतेने घेता यावा, या योजनांचा आणि सेवांचा लाभ मिळविण्यासाठी पात्र लाभार्थींनी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

[अवश्य वाचा: मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना महाराष्ट्र 2023 | Agriculture and Food Processing Scheme Maharashtra 2023|  ]


बांधकाम कामगार कामाच्या मान्यताप्राप्त प्रकारांची यादी: बांधकाम कामगार योजना यादी

बांधकाम इतर बांधकाम कार्य म्हणजे याचा संबंध निर्माण करणे, बदलणे, दुरुस्ती करणे, देखभाल करणे किंवा नाश करणे.

*  इमारती

* रस्त्यावर

* रस्ते

* रेल्वे

* ट्रामवेज

* एअरफील्ड,

* सिंचन,

* ड्रेनेज,

* तटबंध आणि नेव्हिगेशन वर्क्स,

* स्टॉर्म वॉटर ड्रेनेज वर्क्ससह,

* निर्मिती,

* पारेषण आणि पॉवर वितरण,

* पाणी वितरणासाठी चॅनल समाविष्ट करणे

* तेल आणि गॅसची स्थापना,

* इलेक्ट्रिक लाईन्स,

* वायरलेस,

* रेडिओ,

* दूरदर्शन,

* दूरध्वनी,

* टेलीग्राफ आणि ओव्हरसीज कम्युनिकेशन्स,

* डॅम

* नद्या,

* रक्षक,

* पाणीपुरवठा,

* टनेल,

* पुल,

* जलविद्युत,

* पाइपलाइन,

* टावर्स,

* कूलिंग टॉवर्स,

* ट्रान्समिशन टावर्स आणि अशा इतर कार्य,

* दगड कापणे, फोडणे दगडाचा बारीक चुरा करणे.,

* लादी किंवा टाईल्स कापणे पॉलिश करणे.,

* रंग, वॉर्निश लावणे, इत्यादीसह सुतारकाम.,

* गटार नळजोडणीची कामे.,

* वायरिंग, वितरण, तावदान बसविणे इत्यादीसहित विद्युत कामे.,

* अग्निशमन यंत्रणा बसविणे तिची दुरुस्ती करणे.,

* वातानुकूलित यंत्रणा बसविणे तिची दुरुस्ती करणे.,

* उद्वाहने, स्वयंचलित जिने इत्यादी बसविणे.,

* सुरक्षा दरवाजे उपकरणे इत्यादी बसविणे.,

* लोखंडाच्या किंवा धातुच्या ग्रिल्स, खिडक्या, दरवाजे तयार करणे बसविणे.

* जलसंचयन संरचनेचे बांधकाम करणे.,

* सुतारकाम करणे, आभाशी छत, प्रकाश व्यवस्था, प्लास्टर ऑफ पेरीस यांसहित अंतर्गत (सजावटीचे) काम.,

* काच कापणे, काचरोगण लावणे काचेची तावदाने बसविणे,

* कारखाना अधिनियम, 1948 खाली समावेश नसलेल्या विटा, छप्परांवरील कौल इत्यादी तयार करणे.,

* सौर तावदाने इत्यादींसारखी ऊर्जाक्षम उपकरण बसविणे.,

* स्वयंपाकखोली सारख्या ठिकाणी वापरण्यासाठी मोडुलर (आधुनिक) युनिट बसविणे.,

* सिमेन्ट काँक्रिटच्या साचेबद्ध वस्तू इत्यादी तयार करणे बसविणे.,

* जलतरण तलाव, गोल्फचे मैदान इत्यादीसह खेळ किंवा मनोरंजनाच्या सुविधांचे बांधकाम करणे.,

* माहिती फलक, रोड फर्निचर, प्रवाशी निवारे किंवा बसस्थानके, सिग्नल यंत्रणा इत्यादी बांधणे किंवा उभारणे.,

* रोटरीजचे बांधकाम करणे, कारंजे बसविणे इत्यादी.,

* सार्वजनिक उद्याने, पदपथ, रमणीय भू-प्रदेश इत्यादींचे बांधकाम.


[अवश्य वाचा:लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2023| Lek Ladki Yojana Maharashtra Online Apply 2023   ]


महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना:

  • महाराष्ट्र शासनाने इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करून राज्यातील असंघटित बांधकाम कामगारांच्या गटाला बळकटी देण्याचा प्रयत्न केला आहे, बांधकाम कामगारांच्या राहणीमानात सुधारणा करण्यासाठी त्यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी मंडळाने विविध कल्याणकारी योजना आणि सामाजिक कार्यक्रम सुरु केले आहेत. कामगार कल्याणकारी मंडळाचे खालीलप्रमाणे प्रमुख उद्दिष्टे आहेत.
  • महाराष्ट्र राज्यातील सर्व बांधकाम कामगारांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जीवनात सुधारणा आणने त्याच प्रमाणे त्यांना आरोग्य, सुरक्षा प्रदान करून त्यांचे जीवनमान उंचावणे, याचप्रमाणे बांधकाम कामगारांन पर्यंत पोहचून त्यांच्याबद्दल संपूर्ण माहिती गोळा करणे.
  • राज्यातील बांधकाम कामगारांना सामाजिक सुरक्षा, आरोग्य आणि आर्थिक लाभ मिळावा म्हणून विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना या मंडळातर्फे राबविण्यात आल्या आहे. तेसेच नवीन बांधकाम कामगार ऑनलाइन नोंदणी सुलभ करण्यात आली आहे.
  • बांधकाम कामगारांच्या दावा प्रकरणांमध्ये लाभार्थ्यांसाठी दावा अर्ज करण्याची प्रक्रिया आणखी सुलभ करण्यात आली आहे, तसेच कामगारांसाठी कामगार कल्याणकारी मंडळाचे ऑनलाइन वेबसाईट सुरु करून ऑनलाइन कामगार नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे, याचबरोबर विविध योजनांच्या लाभासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करणे.
  • कल्याणकारी मंडळाची कार्यक्षमता वाढविणे हा प्रमुख उद्देश आहे, त्याचप्रमाणे बांधकामाच्या ठिकाणी जाऊन बांधकाम कामगारांची नोंदणी करणे आणि बांधकाम कामगारांची नोंदणी प्रमाण वाढविणे, याचबरोबर बांधकाम कामगारांना नोंदणी क्रमांक देणे, तसेच योजनेची धनराशी कामगार लाभार्थ्यांच्या खात्यात DBT पद्धतीचा वापर करून हस्तांतरित करणे.
  • बांधकाम कामगारांची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुलभ करणे.
  • बांधकाम कामगारांपर्यंत पोहोचून त्यांच्याकडून माहिती गोळा करणे.
  • योजनांच्या लाभासाठीचा अर्ज दाखल करण्याच्या पद्धतींत सुलभपणा आणणे.
  • कल्याणकारी योजनांच्या लाभ देण्याच्या पद्धतींत सुटसुटीतपणा आणणे.
  • लाभाची रक्कम थेट बँक खात्यात जमा करणे.
  • बांधकाम कामगार नोंदणी वाढविण्यासाठी त्यांच्या कामाच्या जागेवर जाऊन नोंदणी करणे.
  • बांधकाम कामगाराच्या कार्यकारी क्षमतेमध्ये कुशलता आणणे.
  • प्रत्येक बांधकाम कामगाराला एकमेव नोंदणी क्रमांक देणे.
  • नोंदणीच्या मान्यतेसाठी मान्यताप्राप्त अधिकाऱ्याकडून नोंदणीची ऑनलाइन प्रक्रिया.
  • कल्याणकारी योजनांच्या व्यवस्थापनासाठी प्रगत विश्लेषण.


महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ

नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सामाजिक सुरक्षा, शैक्षणिक सहाय्य, आरोग्यविषयक सहाय्य, आर्थिक सहाय्य बांधकाम कामगार योजनेअंतर्गत दिली जाते. ते आपण सविस्तरपणे पाहूयात.

) सामाजिक सुरक्षा

 1) पहिल्या विवाहासाठी 30 हजार रुपये :

 नोंदणीकृत लाभार्थ्याला स्वताच्या विवाहाच्या खर्चासाठी 30,000 रुपये अनुदान म्हणून दिले जाते. त्यासाठी विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. आणी त्याच बरोबर पहिला विवाह असल्याबाबतचे शपथपत्र द्यावे लागते.

2) मध्यान्ह भोजन योजना :

 नोंदणीकृत लाभार्थी कामगाराला दुपारचे जेवण मोफत सुविधा या योजनेअंतर्गत दिली जाते.

3) प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना :

वृद्धावस्थेतील कामगारांना निवृत्तीवेतन मिळावे यासाठी केंद्र सरकार प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनाराबवत आहे. या योजनेअंतर्गत, 60 वर्षांच्या वयानंतर प्रत्येक मजुराला दरमहा 3,000 रुपये पेन्शन मिळते. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या आणि दरमहा 15,000 रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणा-या कामगारांना या योजनेचा लाभ घेता येईल. असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार, बांधकाम कामगार, शिंपी, रिक्षाचालक, घरगुती कामगार या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेत नोंदणी करण्यासाठी तुमचे वय 18 ते 60 वर्षे असावे लागते.

4) प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना :

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही सरकारद्वारे राबविण्यात येणारी जीवन विमा योजना आहे. ही योजना एक वर्षाची सुरक्षा देणारी टर्म लाइफ इन्शुरन्स योजना आहे, जी दर वर्षी 436 रुपये भरून नूतनीकरण केली जाऊ शकते आणि कोणत्याही कारणास्तव मृत्यू झाल्यास 2 लाखाचा जीवन विमा संरक्षण प्रदान करते. या योजनेत नोंदणी करण्यासाठी तुमचे वय 18 ते 50 वर्षे असावे लागते.

5) प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना :

18 ते 70 वर्षे वयोगटातील व्यक्ती ज्यांचे बँक खाते आहे, ते 1 जून ते 31 मे या कालावधीसाठी या योजनेत भाग घेऊ शकतात. किंवा त्यापूर्वी 31 मे या कालावधीत या योजनेत सामील होण्यास संमती दिली आहे, त्यांच्यासाठी ही योजना वार्षिक नूतनीकरणाच्या आधारावर उपलब्ध आहे. बँक खात्यासाठी आधार KYC आवश्यक असेल. या योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू आणि पूर्ण अपंगत्वासाठी जोखीम संरक्षण रु. 2 लाख आणि आंशिक अपंगत्वासाठी जोखीम संरक्षण रु. 1 लाख रुपये आहे. खातेधारकाच्या बँक खात्यातून 20 रुपये हफ्ता प्रति वार्षिक प्रीमियम साठी ऑटो डेबिट सुविधेद्वारे कट केला जाईल. ही योजना सार्वजनिक क्षेत्रातील जनरल इन्शुरन्स कंपन्या द्वारे चालवली जाते.

6) पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना :

आ. शैक्षणिक योजना

सूचना : या योजने अंतर्गत सर्व लाभ फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन मुलांसाठी लागू आहेत.

  • नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या पहिल्या 2 मुलांना पहिली ते सातवी मध्ये किमान 75% किंवा त्यापेक्षा अधिक उपस्थिती असल्यास, त्यांना प्रतिवर्षी 2,500 रुपये प्रोत्साहनात्मक शैक्षणिक आर्थिक सहाय्य म्हणून दिले जातात. त्यासाठी शाळेकडून 75% हजेरी बाबतचा दाखला देणे गरजेचे आहे.
  • नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या पहिल्या 2 मुलांना इयत्ता आठवी ते दहावी मध्ये किमान 75% किंवा त्यापेक्षा अधिक उपस्थिती असल्यास, त्यांना प्रतिवर्षी 5000 रुपये प्रोत्साहनात्मक शैक्षणिक आर्थिक सहाय्य म्हणून दिले जातात.
  • नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या पहिल्या 2 मुलांना इयत्ता दहावी इयत्ता बारावी मध्ये कमीत कमी 50% किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त झाल्यास 10,000 रुपये शैक्षणिक आर्थिक सहाय्य म्हणून दिले जातात. त्यासाठी 50% किंवा त्यापेक्षा अधिक गुण असल्याचे गुणपत्रक सादर करणे आवश्यक आहे.
  •  नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या पहिल्या 2 मुलांना इयत्ता अकरावी बारावी च्या शिक्षणासाठी प्रतिशैक्षणिक वर्षी 10,000 रुपये शैक्षणिक सहाय्य म्हणून दिले जातात. त्यासाठी मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झालेले प्रमाणपत्र आणि चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या बाबतची पावती सादर करणे आवश्यक आहे.
  •  नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या पहिल्या 2 मुलांना अथवा पुरुष कामगार यांच्या पत्नीला पदवीच्या प्रथम, द्वितीय तृतीय वर्षाच्या प्रवेश पुस्तके शैक्षणिक सामग्री साठी प्रतिवर्षी 20,000 रुपये शैक्षणिक सहाय्य म्हणून दिले जातात. त्यासाठी मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झालेले प्रमाणपत्र किंवा गुणपत्र आणि चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या ची पावती किंवा बोनाफाईड सादर करणे आवश्यक आहे.
  •  नोंदणी केलेल्या लाभार्थ्याच्या 2 पाल्यांना किंवा पत्नीला वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी महाविद्यालयात संस्थेत प्रवेश घेण्यासाठी पुस्तके शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी प्रत्येक शैक्षणिक वर्षी पदवी अभ्यासक्रमासाठी 1 लाख रुपये अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमासाठी रुपये 60,000 रुपये शैक्षणिक सहाय्य म्हणून दिले जातात. त्यासाठी मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झालेले प्रमाणपत्र आणि चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या बाबतची पावती सादर करणे आवश्यक आहे.
  • नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या पहिल्या 2 मुलांना शासनमान्य पदवीके मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलास प्रति शैक्षणिक वर्षी 20,000 रुपये आणि पदव्युत्तर शिक्षण घेत असल्यास प्रति शैक्षणिक वर्षी 25,000 रुपये आर्थिक सहाय्य म्हणून दिले जातत.
  •  नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या पहिल्या 2 मुलांना संगणकाचे शिक्षण म्हणजे MS-CIT च्या शुल्काची प्रतिपूर्ती केली जाते. त्यासाठी MS-CIT उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. पाल्यांना व्यक्तिमत्व विकास पुस्तक संचाचे वाटप या योजनेअंतर्गत केले जाते.

) आरोग्य विषयक सहाय्य :

  • नोंदणीकृत स्त्री बांधकाम कामगार किंवा पुरुष बांधकाम कामगाराच्या पत्नीला नैसर्गिक प्रसुतीसाठी 15,000 रुपये शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीसाठी 20,000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. ही योजना फक्त पहिल्या 2 मुलांसाठी लागू असेल. त्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले नैसर्गिक किंवा शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीचे प्रमाण पत्र आणि उपचाराची देयके सादर करणे आवश्यक आहे.
  • जर कामगार लाभार्थ्याला किंवा त्याच्या कुटुंबीयांना गंभीर आजार झाले, तर त्याच्या उपचारासाठी 1 लाख रुपये वैद्यकीय सहाय्य एकाच सदस्यास एकाच वेळी कुटुंबातील 2 सदस्यांसाठी मर्यादित आहे. तसेच आरोग्य विमा योजना लागू नसल्यास सदर योजनेचा लाभ दिला जातो. त्यासाठी सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याने गंभीर आजाराबाबत दिलेले प्रमाणपत्र आणि वैद्यकीय उपचार कागदपत्रे आवश्यक आहेत.
  • नोंदणी केलेल्या लाभार्थ्याच्या पहिल्या मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली, तर त्या मुलीच्या नावे 18 वर्षापर्यंत 1 लाख रुपये मुदत बंद ठेव म्हणजे फिक्स डिपॉझिट लाभ दिला जातो. त्यासाठी सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया बाबतचे प्रमाणपत्र आणि अर्जदार कामगाराला एक पेक्षा अधिक मुली नाहीत याचा पुरावा आणि शपथपत्र.
  • नोंदणी केलेल्या कामगाराला 75% किंवा कायमचे अपंगत्व आल्यास त्याला 2 लाख रुपये आर्थिक सहाय्य म्हणून दिले जाते.जर बांधकाम कामगारांचे विमासंरक्षण असेल, तर विमा रकमेची प्रतिपूर्ती किंवा मंडळामार्फत लाख रुपये आर्थिक सहाय्य यापैकी कोणताही एक लाभ दिला जातो. त्यासाठी 75% अपंगत्व किंवा कायमस्वरूपी अपंगत्व असल्याचे वैद्यकीय अधिकार्याकडे प्रमाणपत्र आणि वैद्यकीय उपचाराची देयके सादर करणे आवश्यक आहे.
  • या योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा देखील लाभ घेता येणार आहे. विविध उपचार आणि शस्त्रक्रियांसाठी हॉस्पिटलायझेशन तसेच अत्यावश्यक असलेल्या आपत्तीजनक आजारांसाठी लाभार्थ्यांना कॅशलेस/निःशुल्क आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा प्रदान करणे हे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
  • कामगारांची वेळोवेळी तपासणी केली जाईल. त्यासाठी शासकीय केंद्रातून ऊपचार घेतल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

) आर्थिक सहाय्य

  • नोंदणी केलेल्या लाभार्थ्याच्या कामावर असताना मृत्यू झाला, तर त्याच्या कायदेशीर वारसाला 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. त्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला मृत्यू दाखला किंवा कामावर असताना मृत्यू झाला आहे असा पुरावा सादर करणे आवश्यक आहे.
  • नोंदणीकृत कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाला, तर त्याच्या वारसाला 2 लाख रुपये आर्थिक सहाय्य म्हणून दिले जाते. त्यासाठी सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला मृत्यूचा दाखला सादर करणे गरजेचे आहे.
  • नोंदणी केलेल्या बांधकाम कामगाराला अटल बांधकाम कामगार आवास शहरी योजने अंतर्गत 2 लाख रुपयांची
  • आर्थिक सहाय्य केले जाते. त्यासाठी तो कामगार प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पात्र आहे याचे सक्षम अधिकार्याचे पत्र देणे आवश्यक आहे.
  • नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगाराचा जर मृत्यू झाला, तर त्याच्या अंत्यविधीसाठी मदत म्हणून 10,000 रुपये दिले जातात. यासाठी कामगारांचे मृत्यू वेळी वय 50 ते 60 वर्षे दरम्यान असावे. त्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले मृत्युपत्र आवश्यक आहे.
  • नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगाराचा मृत्यू झाला, तर त्याच्या विधवा पत्नीला अथवा स्त्री कामगाराचा निधन झाले तर विधुर पतीला पाच वर्षाकरीता प्रतिवर्षी 24,000 रुपये आर्थिक मदत म्हणून दिले जातात. त्यासाठी सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला मृत्यूचा दाखला गरजेचा आहे.
  • घर बांधण्यासाठी किंवा घर खरेदी करण्यासाठी बँकेकडून घेतलेल्या होम लोन वरील व्याजाची रक्कम 6 लाख किंवा 2 लाख अनुदान स्वरूपात दिली जाते. त्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेत कर्ज घेतले चा पुरावा किंवा कर्ज किंवा घर पती-पत्नीचा संयुक्त नावे असल्याचा पुरावा गरजेचा आहे.
  • महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगारांकरिता व्यसनमुक्ती केंद्र उपचाराकरिता नोंदीत कामगारास रुपये 6,000 आर्थिक सहाय्य म्हणून दिले जाते.

बांधकाम कामगार आवश्यक किट्स खरेदीसाठी 5000/- रुपये अनुदान, महाराष्ट्र राज्यातील ज्या बांधकाम कामगारांनी महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार मंडळमध्ये नोंदणी केली आहे, अशा पात्र बांधकाम कामगारांना त्यांना आवश्यक असलेली अवजारे आणि बांधकामासाठी लागणारी आवश्यक किट्स खरेदी करण्यासाठी 5000/- रुपये आर्थिक अनुदान दिल्या जाते. हे आर्थिक अनुदान कामगारांनी नोंदणी केल्यानंतर लगेच दिल्या जाते

हे आर्थिक अनुदान तीन वर्षाकरिता असते या नंतर या योजनेचा लाभ पुढील तीन वर्षानंतर मिळवण्यासाठी बांधकाम कामगारांना मंडळामध्ये सलग तीन वर्षे नोंदणी करणे आवश्यक आहे, याचा अर्थ असा होतो बांधकाम कामगारांची मंडळामध्ये नोंदणी सलग तीन वर्ष असेल तर त्यांना पुढील तीन वर्षानंतर 5000/- रुपये आर्थिक मदत मिळेल.

[अवश्य वाचा: free solar rooftop yojana 2023| मोफत सोलर रूफटॉप योजना 2023  ]


बांधकाम कामगारांसाठी घरकुल योजना, योजनेचे बांधकाम कामगारांना लाभ आणि फायदे :-

भारत सरकारने जून 2015 मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेची सुरुवात केली या योजनेचे धोरण देशातील प्रेत्येक नागरीकांजवळ त्यांचे स्वतःचे हक्काचे घरकुल असावे, महाराष्ट्र सरकारने याच धोरणाचा अवलंब करून आणि प्रधानमंत्री आवास योजनेच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन  महाराष्ट्र राज्यात या योजनेची अंमलबजावणी सुरु केली आहे, याच बरोबर या योजनेची अंमलबजावणी पूर्ण राज्यामध्ये सुरळीत होण्यासाठी (राज्यस्तरीय मंजुरी संनियंत्रण समिती) समिती तयार करण्यात आली आहे.

असे बांधकाम कामगार जे महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणीकृत आहे, आणि अटल आवास योजनेंतर्गत घरकुल बांधून घराच्या पूर्ण होण्याचा पुरावा सादर केला आहे ते बांधकाम कामगार महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनेसाठी पात्र असतील. तसेच ज्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी अटल आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल बांधून पूर्ण होण्याचा दाखला सादर केला असेल अशा लाभार्थी कामगारांना जमीन खरेदी आणि घरकुल निर्माणा संबंधित झालेल्या खर्चाची परतफेड म्हणून महाराष्ट्र इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे दोन लाख अनुदान आर्थिक मदत देण्यात येईल, आणि हि आर्थिक अनुदान लाभार्थ्यांचा बँकेच्या खात्यात थेट जमा केल्या जाईल.

महाराष्ट्र बांधकाम कामगार आवास योजना, महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार मंडळामध्ये नोंदणीकृत (सक्रीय) बांधकाम कामगार जे प्रधानमंत्री आवास योजनेस पात्र आहेत, तसेच असे कामगार जे हि पात्रता पूर्ण करतात अशा कामगारांना बांधकाम आवास योजनेचा लाभ मिळेल, या योजनेमध्ये लाभ देण्यासाठी नोंदणीकृत बांधकाम कामगारांची पात्रता निश्चित करण्याच्या संबंधित जवाबदारी कामगार मंडळ आणि संबंधित विभागाची असते

कामगार आवास योजनेमध्ये विभागाकडून निश्चित करण्यात आलेल्या पात्र कामगारांना घरकुल निर्माणा मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सवलती देण्यात येतात त्याचबरोबर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून पात्र लाभार्थ्यांना अतिरिक्त आर्थिक अनुदान देण्यात येते. त्याचप्रमाणे या योजनेमध्ये म्हाडा मध्ये लागू असलेला बांधकाम FSI बांधकाम कामगार आवास योजनेंतर्गत निर्माण केलेल्या घरकुलांना देण्यात येतो. हा बांधकाम FSI फक्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील घरकुलांना लागू करण्यात येतो.

महाराष्ट्र बांधकाम कामगार नोंदणी ऑनलाइन पात्रता (Eligibility):

महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या योजनांचा किंवा सेवांचा लाभ मिळविण्यासाठी पात्रता आवश्यक असते, हि पात्रता तपासण्यासाठी शासनाच्या बांधकाम कामगार योजनेच्या अधिकृत वेबपोर्टल वर भेट देणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे शासनाच्या कामगारांसाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी सर्वप्रथम बांधकाम कामगारांना नोंदणी करणे आवश्यक आहे, या योजनेमध्ये बांधकाम कामगारांना नोंदणी करण्यासाठी पात्रता खालीलप्रमाणे आहे.

  • लाभार्थी कामगार हा महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असावा
  • अर्ज करणारा कामगार हा बांधकाम कामगार असावा
  • अर्जदार 18 ते 60 वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे
  • अर्जदार कामगार एक वर्षाच्या कालावधीत किमान 90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम करणे आवश्यक आहे.


[अवश्य वाचा: ऑनलाइन फॉर्म: महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023: Maharashtra Solar Pump Yojana 2023 ]

बांधकाम कामगार नोंदणी साठी आवश्यक कागदपत्रे:

मंडळात नोंदणी करण्याकरीता फॉर्म – V भरुन खालील प्रमाणे दस्तऐवजासह अर्ज सादर करणे अनिवार्य आहे.

  • वयाचा पुरावा
  • 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
  • रहिवासी पुरावा
  • ओळखपत्र पुरावा
  • पासपोर्ट आकाराचे 3 फोटो
  • नोंदणी फी- रू. 25/- 5 वर्षासाठी वार्षिक वर्गणी रू.60/-
  • पॅन कार्ड
  • रेशनकार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • आधार कार्ड
  • मतदान ओळखपत्र
  • रहिवाशी पुरावा
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • नियोक्त्याचे मागील वर्षभरात ९० दिवस किंवा दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याच्या दाखला (इंजिनिअर/ठेकेदार) किंवा महानगर पालिकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र किंवा ग्रामपंचायतकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र.

बांधकाम कामगार नोंदणी आणि नुतनीकरण कार्यप्रणाली:

महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांच्या नोंदणी आणि नोंदणी नुतनीकरण करण्याची कार्यप्रणाली यांच्या संबंधित तसेच बांधकाम आस्थापनांची संपूर्ण नोंदणी आणि बांधकाम आस्थापनांकडून होणारी उपकराची वसुली या सर्व सबंधित कार्यप्रणालीला महाराष्ट्र शासनाकडून प्राथमिकता देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे विभाग प्रमुखांनी वर्षभरात जमा केलेली उपकाराची रक्कम बांधकाम अस्थापनांची नोंदणी आणि नोंदणीकृत बांधकाम कामगार तसेच त्यांना देण्यात आलेले 90 दिवसाचे नोंदणी किंवा नोंदणी नुतनीकरण प्रमाणपत्र या सर्व कामगारांविषयी माहितीचा आढावा महाराष्ट्र शासनाने घेतला होता

त्यानुसार मंडळामध्ये राज्यातील बांधकाम कामगारांची नोंदणी प्रमाण वाढविण्याच्या हेतूने आणि तसेच बांधकाम कामगारांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी शासनाच्या जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, म्हाडा, सिडको, एम.आय.डी.सी आणि बांधकाम क्षेत्रांशी सबंधित असेलेल्या बांधकाम आस्थापनांची नोंदणी करण्यासाठी आणि बांधकाम कामगारांना आवश्यक प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून आदेश देण्यात आले आहेत.

  • राज्यातील बांधकाम कामगारांची नोंदणी प्रमाण वाढविण्याच्या हेतूने आणि कामगारांना विविध योजनांचा लाभ मिळऊन देण्यासाठी शासनाने खालीलप्रमाणे निर्देश दिले आहेत.
  • विभाग प्रमुखांनी वर्षनिहाय जमा लेलेल्या उपकराची रक्कम तसेच बांधकाम आस्थापनांनी केलेली नोंदणी आणि नोंदणीकृत केलेले एकूण बांधकाम कामगार कामगारांना देण्यात आलेले नव्वद दिवसाचे नोंदणी आणि नुतनीकरण प्रमाणपत्र याप्रमाणे पूर्ण माहिती शासनास सादर करावी.
  • बांधकाम कामगारांची नोंदणी, नुतनीकरण करण्या संबधित कार्यवाही तसेच बांधकाम आस्थापनांकडून उपकराची वसुली त्याचप्रमाणे बांधकाम आस्थापनांची नोंदणी शंभर टक्के पूर्ण होईल संपूर्ण दक्षता घेण्यात यावी.
  • बांधकाम कामगारांना आवश्यक प्रमाणपत्र देण्यासाठी आणि बांधकाम आस्थापनांची नोंदणी करण्यासाठी सबंधित नियोक्त्यास निर्देश देण्याबाबत आदेश देण्यात यावे
  • केंद्र शासनाच्या इमारत इतर बांधकाम कामगार कल्याण उपकर नियम 1998 च्या नियम 3 नुसार निर्गमित केलेल्या दिनांक 26.9.1996 च्या अधिसूचनेनुसार एक टक्का उपकराची रक्कम इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे चुकता जमा करावी.
  • शासन निर्णय उद्योग, उर्जा कामगार विभाग, क्र. बीसीए 2009/प्र.क्र 108/कामगार 7-, दि. 17 जून, 2010 मध्ये नमूद कार्यप्रणालीचे पालन करावे.

महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण आवास योजना पात्रता:

महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये लाभार्थी बांधकाम कामगार हा नोंदणीकृत असावा आणि या योजनेस पात्र असावा. महाराष्ट्र बांधकाम कामगार आवास योजनेंतर्गत लाभास पात्र असणारा गृहनिर्माण प्रकल्प महारेरा अधिनियम 2016 अंतर्गत नोंदणीकृत असावामहाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून प्रती लाभार्थी पात्र बांधकाम  कामगारांना मिळणारे दोन लाख इतके अनुदान, नोंदणीकृत लाभार्थी कामगार कोणत्याही घरकुल प्रकल्पातील योजनेत सहभागी असल्यास महाराष्ट्र बांधकाम कामगार आवास योजनेंतर्गत लाभास पात्र राहतीलमहाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणी असलेले बांधकाम कामगार आणि राज्यातील बांधकाम क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष काम करणाऱ्या बांधकाम कामगारांच्या प्रमाणामध्ये तफावत आहे, त्यामुळे हा मोठा फरक कमी करण्याच्या हेतूने आणि बांधकाम कामगारांना, बांधकाम कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणी करण्यासाठी आकर्षित करण्याच्या दृष्टीने मंडळाने विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना जाहीर करून, बांधकाम कामगारांना नोंदणी करण्यासाठी आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने 22.9.2017 रोजी बैठक घेऊन शासनमान्यतेनुसार या या योजनेची सुरुवात केलीमहाराष्ट्र राज्यात तसेच देशातसुद्धा बांधकाम क्षेत्र मोठ्या प्रमाणात रोजगाराचा निर्माण करत त्यामुळे या बांधकाम क्षेत्रात रोजगार मिळविण्याच्या दृष्टीने ग्रामीण भागातील दुर्बल आर्थिक वर्गातील नागरिक मोठ्या प्रमाणात शहराकडे येतात त्यामुळे या बांधकाम कामगारांजवळ निवाऱ्याच्या दृष्टीने किंवा दैनंदिन जीवनाला लागणाऱ्या जीवनावश्यक उपयोगी वस्तूंचा मोठ्या प्रमाणात आभाव असतो, कामगारांच्या या समस्यांचा किंवा अभावांचा सर्वांगीण विचार लक्षात घेऊन शासनाने या योजनेची सुरुवात कामगारांसाठी केली आहे. या योजनेच्या अंतर्गत कामगारांना दैनंदिन जीवन जगण्याला लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचा संच पुरविण, आणि कामगारांच्या दैनंदिन जीवनातील समस्यांना कमी करणे.

शासन निर्णय बांधकाम कामगारांना आवश्यक वस्तूंचा संच देण्याविषयी:

राज्यामध्ये बांधकाम क्षेत्र हे मोठ्याप्रमाणात रोजगार निर्माण करणारे क्षेत्र आहे त्यामुळे या क्षेत्रामध्ये रोजगार शोधण्यासाठी ग्रामिण भागामधील आर्थिकदुर्बल नागरिक मोठ्या प्रमाणावर येतात, अशावेळी त्यांच्याकडे राहण्यासाठी तसेच दैनंदिन उपयोगातील जीवनावश्यक वस्तूंची कमतरता असते. त्यानंतर या बांधकाम कामगारांना एक काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या जागेवर स्थलांतर करावे लागते. या योजनेच्या माध्यमातून अशाप्रकारच्या अत्यावश्यक वस्तूंचा संच पुरविणे आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंची कमतरता भरून काढणे त्याचप्रमाणे बांधकाम कामगारांना मंडळाकडे नोंदणी करण्यासाठी आकर्षित करणे यासाठी अत्यावश्यक वस्तू संच पुरविणे हि योजना महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने दिनांक 27 ऑक्टोबर 2020 रोजीच्या बैठकीत ठरविण्यात येऊन, राज्यातील मंडळाकडे नोंदणीकृत दहा लाख सक्रीय बांधकाम कामगारांना जीवनावश्यक वस्तू संच पुरविण्याचा ठराव खालीलप्रमाणे मंजूर करण्यात आलामहाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणीकृत (सक्रीय) असलेल्या बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ मिळेलबांधकाम कामगार मंडळामध्ये सक्रीय नोंदणीकृत बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील, या नोंदणीकृत पात्र कामगार लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्राधिकृत सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडे भरून दिल्यानंतर जीवनावश्यक वस्तू संच पुरविण्यात येईल.

बांधकाम कामगारांना पुरविण्यात येणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंचा संच खालीलप्रमाणे राहील आणि वितरण कार्यप्रणाली

  • ताट-चार नग
  • वाट्या-आठ नग
  • पाण्याचे ग्लास-चार नग
  • पातेले झाकणा सहित- तीन नग   
  • मोठा चमचा- एक नग ( भात वाटप )
  • मोठा चमचा एक नग ( वरण वाटप )
  • पाण्याचा जग – ( दोन लिटर ) एक नग
  • डब्बा चार नग
  • परात एक नग
  • प्रेशर कुकर ( पाच लिटर ) एक नग
  • कढई ( स्टील ) एक नग
  • स्टील टाकी ( मोठ्या झाकाणासाहित ) एक नग
  • याचबरोबर पात्र बांधकाम कामगारांना पुरविण्यात येणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंचा संच्यामध्ये  खालील वस्तूंचा समवेश असावा
  • प्लास्टिक चटई, मच्छरदाणी, सोलर टॉर्च, जेवणाचा डब्बा, पाण्याची बाटली, खांद्यावरील बॅग, पत्र्याची पेटी, इत्यादी वस्तूंचा समावेश आहे.
  • लाभार्थी पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक वस्तूंचा संच पुरविण्याबाबत -निविदा पद्धतीचा अवलंब करून नोंदणीकृत, नामांकित अनुभवी संस्थेची निवड करावी, तसेच यासंदर्भात उद्योग, उर्जा कामगार विभाग शासन निर्णयाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.
  • बांधकाम कामगारांना पुरविण्यात येणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंचा संच मधील पुरविण्यात येणाऱ्या वस्तूंचे दर, पुरवठा, वाहतूक आणि वितरण सर्व करांसहित निचित करण्यात यावे.
  • बांधकाम कामगारांना पुरविण्यात येणाऱ्या अत्यावश्यक वस्तू संच (Essential Kit) च्या निविदा स्वीकृत करण्यापूर्वी अत्यावश्यक वस्तू संच मधील वस्तूंच्या दर्जाची शासन मान्य प्रयोग शाळेकडून तपासणी खात्री करून घावी तसे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर अत्यावश्यक वस्तूंचे वितरण लाभार्थी कामगारांमध्ये करावे.
  • यामध्ये सबंधित सहाय्यक कामगार आयुक्त यांनी रीतसर प्रमाणित केलेल्या पात्र नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या यादीनुसार विहित मुदतीचे आत अत्यावश्यक वस्तू संच पुरवठा करावा.
  • पात्र लाभार्थी बांधकाम कामगरांना अत्यावश्यक वस्तू संच प्राप्त झाल्याचे सरकारी कामगार अधिकारी यांनी खात्री करून पुरवठा केल्याची पोचपावती उपायुक्त कामगार यांना सादर करावी. अत्यावश्यक वस्तू संच पुरवठ्याचा खर्च मंडळाकडील जमा उपकर निधीतून भागविण्यात यावा. सदर योजनेच्या परिणामकारक अंमलबजावणी देखरेखीचे काम कामगार आयुक्त यांनी पाहावे.
  • लाभार्थी पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक वस्तू संच पुरवठा करण्याची कार्यवाही महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने निश्चित केलेल्या कालावधीत पूर्ण करावी. कालावधी वाढविण्यास मान्यता देण्याचे अधिकार महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळास राहतील.

बांधकाम कामगार योजना ऑनलाईन फॉर्म:

  • या योजने अंतर्गत नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • होमपेज वर गेल्यानंतर तुम्हाला बांधकाम कामगार नोंदणी असा पहिलाच ऑप्शन मिळेल. त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
  • आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.
  • त्यामध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे.
  • आधार नंबर भरायचा आहे.
  • मोबाईल नंबर भरल्यावर Process to Form या बटनावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुमच्या समोर बांधकाम कामगार नोंदणी अर्ज ओपन होईल.
  • त्यामध्ये खालील विचारलेली सर्व माहिती तुम्हाला भरावी लागेल.
  • वैयक्तिक माहिती/Personal Details
  • कायमचा पत्ता/ Permanent Address
  • कौटुंबिक तपशील/ Family Details
  • बँक तपशील / Bank Details
  • नियोक्ता तपशील / Employer Details
  • ९० दिवसांच्या कामकाजाच्या दाखल्याचा तपशील / Details of the 90 Days Working Certificate
  • पुराव्याचे दस्तऐवज / Supporting documents
  • वरील सर्व माहिती भरून Save बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर भरलेली माहिती तपासून झाल्यावर तुम्हाला तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे.

Maharashtra Construction Workers Registration Renewal :

महाराष्ट्र बांधकाम कामगार मंडळामध्ये आधीच नोंदणीकृत असलेल्या बांधकाम कामगारांना कामगार मंडळाच्या योजनांचा सत्यात्याने लाभ मिळविण्यासाठी नोंदणीकृत कामगारांना ठराविक कालावधीनंतर त्यांच्या नोंदणीचे नुतनीकरण करणे आवश्यक आहे, नोंदणीचे नुतनीकरण करण्यासाठी खालील पद्धतीचे अनुसरण करा.

  • महाराष्ट्राच्या BOCW च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या, या नंतर कंस्ट्रक्शन वर्कर ऑनलाइन रिनिवल या बटनावर क्लिक करा, तुमच्यासमोर एक नविन विंडो उघडेल या नंतर खालील पर्ययामधून तुमच्या सबंधित पर्याय निवडा.
  • यामध्ये तुम्ही निवडलेल्या पर्ययानुसार सम्पूर्ण तपशीलवार माहिती भरा
  • यानंतर तुमच्या समोर एक नुतनीकरण फॉर्म उघडेल यामध्ये संपूर्ण तपशिलासह माहिती भरून आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा.
  • वेबसाईट वर तुमची कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुमच्यासमोर वेबसाईट सबंधित नियमांचा आणि अटी यांचा एक चेक बॉक्स येईल त्याला टिक करून आपला नुतनीकरण अर्ज सबमिट करा.
  • नुतानिकरणासाठी लागणारी आवशयक कागदपत्रे या प्रमाणे आहे : कामगाराचे ओळखपत्र, अधिकृत 90 दिवस बांधकामचे प्रमाणपत्र, इत्यादी

BOCW मंडळाच्या अंतर्गत दावा अर्ज कसा करावा ?

महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये कामगारांना दावा करण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालीलप्रमाणे प्रक्रिया असेल

  • महाराष्ट्राच्या कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबपोर्टल वर जाऊन, वेबसाईट च्या होम पेज वर पुढील ऑप्शनवर क्लिक करा कंस्ट्रक्शन्स वर्कर अप्लाय ऑनलाइन फॉर क्लेम
  • उघडलेल्या पेजवर समोरील सबंधित ऑप्शन निवडा, नवीन दावा / दावा अपडेट
  • त्यानंतर निवडलेल्या ऑप्शन नुसार तुमचा नोंदणी क्रमांक किंवा पोचपावती क्रमांक प्रविष्ट करा
  • समोर दिसत असलेल्या क्लेम फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती तपशीलवार भरा, त्यानंतर निर्धारित पध्दतीने आवश्यक कागदांची यादी अपलोड करा.
  • या संपूर्ण पडताळणी करून सबमिट बटनावर क्लिक करून रीतसर भरलेला फॉर्म सबमिट करावा.

महाराष्ट्र बांधकाम कामगार नोंदणी (ऑफलाईन):

महाराष्ट्र शासनाच्या इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणी करण्यासाठी कामगारांना मंडळाच्या अधिकृत वेबपोर्टल वर जाऊन ऑनलाइन पद्धतीच्या व्यतिरिक्त कामगार थेट BOCW मंडळाच्या संबधित कार्यालयात जाऊन ऑफलाईन पद्धतीने सुद्धा नोंदणी फॉर्म भरू शकतात. ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यासाठी खालीलप्रमाणे प्रक्रिया आहे.

  • ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करण्यासठी सर्व सर्वप्रथम आपल्याला शासनाच्या कामगार मंडळाच्या अधिकृत  वेबसाईट वर जाऊन कामगार नोंदणी फॉर्म डाऊनलोड करावा लागेल किंवा सरळ खाली दिलेल्या लिंकवरून फॉर्म डाऊनलोड करून घावा.
  • यानंतर फॉर्मची प्रिंटआउट काढून घावी लागेल, या नंतर पूर्ण तपशीलवार माहिती भरून फॉर्म पूर्ण करा
  • फॉर्म सोबत आवश्यक कागदपत्रे जोडा
  • यानंतर महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सबंधित कार्यालयात जाऊन जमा करा.
  • नोंदणी फॉर्म कार्यालयात जमा केल्यानंतर तुम्हाला याच्या संबंधित पोचपावती मिळेल, ती पावती सुरक्षित ठेवा. नोंदणी फॉर्मची पडताळणी पूर्ण झाल्यावर अधिकारी तुमचा नोंदणी फॉर्म पुढे पाठवतील.

तपशिल / Particular

लिंक / Link

बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म (संदर्भा साठी) Construction Worker's Registration Form (For reference)

डाउनलोड

Download

बांधकाम कामगार नूतनीकरण फॉर्म (संदर्भा साठी)Construction Worker's Renewal Form (For reference)

डाउनलोड

Download

ग्रामसेवक / महानगरपालिका / नगरपरिषदेतर्फे बांधकाम कामगाराने मागील वर्षभरात ९० किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र (संदर्भा साठी)90 Days Work Certificate - Gramsevak for Worker Registration (For reference)

डाउनलोड

 

Download

- नोंदणी व नुतणीकरण करण्यासाठी संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेले नविन 90 दिवसांचे प्रमाणपत्र वापरण्यात यावे.

 

 

 

The new 90 day certificate made available on the website should be used for registration and renewal.

 

बांधकाम कंत्राटदाराचे /ठेकेदाराचे बांधकाम कामगाराने मागील वर्षभरात ९० किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र (संदर्भा साठी)90 Days Work Certificate - Developer for Worker Registration (For reference)

डाउनलोड

Download

ऑनलाइन नोंदणीसाठी: आधार संमती फॉर्म (संदर्भा साठी)Aadhaar Consent Form for online Registration (For reference)

डाउनलोड

Download

ऑनलाइन नोंदणीसाठी: स्वयंघोषणापत्र (संदर्भा साठी)Self Declaration Form for online Registration (For reference)

डाउनलोड

Download

महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना, कामगार नोंदणी, दावा फॉर्म, नोंदणी नुतनीकरण, किंवा मंडळाच्या पोर्टल विषयी काही प्रश्न किंवा आणखी माहिती जाणून घायची असल्यास, खालीलप्रमाणे महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकता.

वाचक मित्रहो या लेखामध्ये आम्ही महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कामगारांच्या कल्याणासाठी असलेल्या योजना आणि कामगारांची नोंदणी, नोंदणी नुतनीकरण इत्यादी संबंधित संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तरीही आपल्याला आणखी माहिती जाणून घायची असल्यास खालीलप्रमाणे संपर्क करावा फोन (022) 26572631.

-मेल    info@mahbocw.in

कार्यालयाचा पत्ता  महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, पाचवा मजला, एम एमटीसी हाउस, प्लॉट सी–22, ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे(), मुंबई–40051, महाराष्ट्र

BOCW Registration Online Maharashtra | Online Worker Registration | www.mahabocw.in  Marathi | Maharashtra Construction Workers Registration, Apply Online Renewal, Online Claim Information in Marathi | बांधकाम कामगार योजना 2023 माहिती मराठी | महाराष्ट्र बांधकाम कामगार नोंदणी ऑनलाइन | Online Workers Registration Maharashtra | बांधकाम कामगार योजना | बांधकाम कामगार योजना फायदे | बांधकाम कामगार योजना | बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म | बांधकाम कामगार योजना यादी | बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णय | बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णय 2022 | बांधकाम कामगार योजना २०२२ | बांधकाम कामगार योजना 2022 लिस्ट | बांधकाम कामगार योजना महाराष्ट्र | बांधकाम कामगार योजना फायदे 2023

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने