Facebook SDK

 

आकाशाच्या पार्श्वभूमीवर झळकणारा आनंद, ऑगस्ट महिन्यातील पर्जन्यमान सहभागी व्हा!

पर्जन्यमान

महाराष्ट्रात इतकेदिवस मुसळधार पाऊस बरसणार ! कोणत्या जिल्ह्यात जोरदार बरसणार ? वाचा IMD चा अंदाज, AUGUST Monsoon updates!




शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा ऑगस्ट महिन्यातील नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. ऑगस्ट महिन्यात कस हवामान राहणार, कोणत्या कालावधीत पाऊस पडणार, कोणत्या कालावधीत पावसाची उघडीप राहणार याबाबत पंजाबरावांनी अतिशय महत्त्वाची माहिती शेतकऱ्यांसाठी जारी केली आहे.

 खरंतर, काल भारतीय हवामान विभागाने राज्यात आगामी काही दिवस काही भागात जोरदार पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान विभागाने राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात आगामी काही दिवस पाऊस सक्रिय राहणार असा अंदाज व्यक्त केला आहे.

 

IMD ने आज आणि उद्या मुंबईसह दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जळगाव नंदुरबार या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच आज मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यात मेघगर्जेनेसह पावसाचा अंदाज आहे. उद्या छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात आणि उत्तर कोकणातील ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एकंदरीत आगामी काही दिवस राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पंजाब रावांनी देखील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे.

4 ऑगस्ट पासून ते 13 ऑगस्ट पर्यंत राज्यात पावसाची प्रामुख्याने उघडीप राहील, 14 ऑगस्ट पासून राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात

माहितीनुसार, राज्यात जुलै महिन्यात पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला. मात्र आता एक ऑगस्ट पासून पावसाचा जोर ओसरला आहे. एक ऑगस्ट ते 4 ऑगस्ट दरम्यान राज्यात पावसाची शक्यता आहे मात्र पावसाचा जोर कमी राहणार आहे.

 या कालावधीत दीर्घकाळ पाऊस पडणार नाही, तुरळक ठिकाणी 20 ते 30 मिनिटांचा पाऊस पडेल आणि नंतर लगेच ऊन पडेल अशी परिस्थिती राहणार आहे. तसेच 4 ऑगस्ट पासून ते 13 ऑगस्ट पर्यंत राज्यात पावसाची प्रामुख्याने उघडीप राहील असा अंदाज आहे.

13 ऑगस्ट नंतर मात्र राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार होईल आणि 14 ऑगस्ट पासून राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार असा अंदाज पंजाब रावांनी यावेळी व्यक्त केला आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी 13 ऑगस्टपर्यंत आपली शेतीची कामे करून घ्यावीत असा सल्लादेखील पंजाब रावांनी दिला आहे. एकंदरीत जुलै महिन्यात पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर आता काही काळ पाऊस विश्रांती घेणार असल्याचे पंजाबरावांनी स्पष्ट केले आहे.

जुलै महिन्यात राज्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला. राज्यातील अनेक भागात मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला. काही भागात अतिवृष्टी देखील झाली. या अतिवृष्टीमुळे राज्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. यामुळे सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाले.मात्र आता गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यातून पावसाचा जोर ओसरला आहे. याचा परिणाम म्हणून पूरस्थिती देखील निवळत चालली आहे. अशातच भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा हवामान अंदाज समोर आला आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आता पावसाचा जोर कमी होणार आहे. मात्र असे असले तरी पुढील पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस बरसणार असा अंदाज आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आगामी पाच दिवस राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचं मत हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. कोकणात प्रामुख्याने दक्षिण कोकणातील रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे.

याव्यतिरिक्त मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात देखील विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता यावेळी वर्तवण्यात आली आहे. राज्यात उर्वरित भागात केवळ ढगाळ हवामान राहणार आहे. आज पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता आहे.याव्यतिरिक्त रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राजधानी मुंबईमध्ये आज तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

 

तसेच आज आणि उद्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एकंदरीत राज्यात आगामी काही दिवस तुरळक ठिकाणी भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने