Facebook SDK

 

योजना आणि कौशल्य - शेतीपुरक व्यवसायाचे रहस्य!


योजना आणि कौशल्य - शेतीपुरक व्यवसायाचे रहस्य!

भारतीय शेती अजूनही पारंपरिक पद्धतीनेच केली जाते.शेतकऱ्यांनी आता नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे महत्त्वाचे आहे.शेतीसाठी कोणते पूरक व्यवसाय करुन नफा मिळवता येतो याची माहिती असणे तेवढेच आवश्यक आहे.



मित्रांनो, आज आपण शेती निगडित असणारे व्यवसाय जाणून घेणार आहोत. मित्रांनो महाराष्ट्र मधील 70 टक्के जमीन ही कोरडवाहू आहे म्हणजे याचा पूर्णपणे वापर हा पाऊस झाल्यानंतरच करू शकतो.

मित्रांनो अशा मध्ये आपल्याला शेतीपूरक व्यवसायांची आठवण येत असते. म्हणूनच मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी शेतीपूरक व्यवसाय कोणकोणत्या आहेत याबद्दलची माहिती घेऊन आलेलो आहोत.

CONTENT

👉कृषी पूरक व्यवसाय / शेतीपूरक व्यवसाय

👉कुक्कुटपालन (poultry farming)

👉शेळीपालन

👉दुग्ध व्यवसाय /डेअरी फार्म

👉मुरघास निर्मिती

👉मशरूम शेती (Mushroom production)

👉रेशीम उद्योग

👉मधुमक्षिका पालन

👉गांडूळखत निर्मिती व्यवसाय

👉फुलांची विक्री

👉शेळीपालन

👉बदक पालन

👉ससेपालन

👉यंत्र सामुग्री विक्री व्यवसाय

👉कृषी पर्यटन उद्योग

 

कुक्कुटपालन (poultry farming)

हा व्यवसाय शेतीसोबतच घरीदेखील केला जातो आणि यात कमीत कमी कोंबडीपासून देखील सुरुवात होते.कुक्कुटपालन हे शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर केले जाऊ शकते.यात नफा देखील चांगला मिळतो.

 

 शेळीपालन

मित्रांनो, शेतीबरोबर शेळी पालन हा व्यवसाय खूपच महत्त्वाचा असा असणारा व्यवसाय आहे. शेळी पालन हा व्यवसाय सुरू करून आपण आर्थिक नफा देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये कमवू शकता.हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला खूपच कमी गुंतवणुकीची गरज असते.

दुग्ध व्यवसाय /डेअरी फार्म

मित्रांनो, आपण जर शेतकरी असाल तर आपण गाई म्हशी घेऊन त्यांचा चांगल्या प्रकारे सांभाळ करून दूध विक्रीचा व्यवसाय देखील करू शकता. यासाठी आपल्याला शेतामध्ये चारा लागवड करून त्याचा उपयोग डेअरी फार्म साठी करावा लागतो.

 

मुरघास निर्मिती

मित्रांनो, मुरघास हा डेअरी फार्म साठी खूपच अत्यंत असे असणारे महत्त्वाचे पशुखाद्य आहे.मुरघास हा मक्याच्या पिकांपासून तसेच ज्वारीच्या पिकापासून बनवला जातो.शेतकरी मुरघासचे उत्पादन खूपच मोठ्या प्रमाणामध्ये करून घेत असतात.


मशरूम शेती (Mushroom production)

हा एक आधुनिक व्यवसाय आहे.हा व्यवसाय ग्रामीण तसेच शहरी भागात देखील केला जाऊ शकतो.यासाठी कमी भांडवलावर सुरुवात करता येते आर्थिक नफा जास्त मिळतो.

रेशीम उद्योग

मित्रांनो, शेतकऱ्यांना शेतीवर आधारित पूरक उद्योग सुरू करणे काळाची गरज बनली आहे.मित्रांनो यामध्ये रेशीम आणून त्याचे चांगले संगोपन करून त्यापासून रेशीम तयार करून ते विक्री करता येते.

मधुमक्षिका पालन

मित्रांनो, या व्यवसायामध्ये ठराविक आकाराची पेटी वापरली जाते या पेटीचा वापर मध जमा करण्यासाठी केला जात असतो.आपण जर मधुमक्षिका पालन हा व्यवसाय सुरू करून यामधून खूपच मोठ्या प्रमाणामध्ये नफा कमवू शकतो हा व्यवसाय अतिशय चांगला असा असणारा व्यवसाय आहे.

गांडूळखत निर्मिती व्यवसाय

यासाठी आपल्याला बेड्स तयार करावे लागतील.तयार होणारा गांडूळखत हा आपण आपल्या शेतीसाठी वापरू शकतो त्यातून चांगले उत्पन्न देखील मिळवू शकतो.

फुलांची विक्री

फुले विक्रीचा व्यवसाय सुरू करून आपण यामधून देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये नफा कमवू शकतो. मित्रांनो शेतकरी वर्गाला फुलांच्या उत्पादनाचे आणि फुलांचा व्यवसाय करण्यासाठी जागेची देखील खूपच आवश्यकता असते.

शेळीपालन

मित्रांनो, शेतीबरोबर शेळी पालन हा व्यवसाय खूपच महत्त्वाचा असा असणारा व्यवसाय आहे. शेळी पालन हा व्यवसाय सुरू करून आपण आर्थिक नफा देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये कमवू शकता.हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला खूपच कमी गुंतवणुकीची गरज असते.

बदक पालन

बदक हा एक पक्षी आहे हा पाण्यात राहतो.त्याच्या विक्रीमधून नफा मिळवता येतो.हा एक शेतीपूरक व्यवसाय आहे.

 

ससेपालन

ससेपालन हा एक छंद जरी असला तरी तो एक चांगला उद्योग निर्माण होऊ शकतो.

 

यंत्र सामुग्री विक्री व्यवसाय

आज शेतीदेखील आधुनिक होत आहे त्यामुळे आज अनेक यंत्र शेतीकामासाठी वापरले जातात.हे यंत्र गावापासून दूरच्या शहराच्या ठिकाणी असतात पण ते खरेदी करणे थोडे महाग पडते.पण हा जर व्यवसाय गावाकडे चालू केला तर वेळ आणि पैसे दोन्हीची बचत होऊन शेतकरी बंधूंना आधार मिळेल.

 

कृषी पर्यटन उद्योग

 

कृषी पर्यटन म्हणजे शहरातील पर्यटकांना बोलावून तुमची शेती, गावाकडील जीवन आणि संस्कृती याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना देणे.

जसे कि गावाकडचे लोक कसे राहतात, कोणत्या प्रकारचे पदार्थ खातात, गावाकडे शेती कशी केली जाते, त्या स्थानिक क्षेत्रात कोणकोणती पिके घेतली जातात, त्या क्षेत्रात असलेल्या भाज्यांची आणि फळांची माहिती देणे, बैलगाडी ची सवारी, हुर्डापार्टी, शेणाच्या गौऱ्या बनवणे, चुलीवर जेवण बनवणे अशा प्रकारचे अनेक नवनवीन अनुभव तुम्ही या शहरी लोकांना देऊ शकता आणि त्या बदल्यात त्यांच्या काढून काही पैसे charge करू शकता.

आता अनेकांना वाटेल हेहे.यात काय विशेष आहे या गोष्टी तर आम्ही रोज करतो अरे आपल्याला या गोष्टी विशेष वाटत नाही पण शहरातील आणि Foreign मधील लोकांसाठी या गोष्टी खूप विशेष आहे.



#यशस्वी शेतीपुरक व्यवसाय, #शेतीप्रदर्शन, #कृषि योजना, #कृषि कौशल्य, #शेती उत्पादन, #खताचे व्यवसाय, #कृषि सल्ला, #फसल व्यवस्थापन, # शेती चे उपाय, प्रौद्योगिकी शेतीपर, #कृषि निवेश, #कौशल्य प्रशिक्षण, #उन्नत शेती, #शेती माहिती, #कृषि विपणन, #जैविक शेती, #उत्पादन सुधारणा, #कृषि विकास.

#agricultural business secrets, #farming entrepreneurship,# agricultural planning, #farming skills, #crop production, #fertilizer industry,# agricultural advice,# crop management, #farming solutions, #agricultural technology, #investment in agriculture, #skill training, #modern farming, #farming knowledge, #agricultural marketing, #organic farming, #production enhancement, #agricultural development.

 


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने