Facebook SDK

महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना :2023 संपूर्ण माहिती!

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana 2023 full details !

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना : 2023 full details !



Maharashtra Mukhyamantri Saur Krishi Pump Yojana 2023 | सौर कृषी पंप योजना 2023 | महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 संपूर्ण माहिती मराठी | महाराष्ट्र सरकारी योजना | Solar Pump Yojana Maharashtra | सौर कृषी पंप योजना ऑनलाइन अर्ज |


मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना 2023 संपूर्ण माहिती: Mukhyamantri Saur Krishi Pump Yojana 2023 full detail's:

Maharashtra Mukhyamantri Saur Krishi Pump Yojana शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप  योजना  सुरू केली आहे. या योजनेंतर्गत, राज्य सरकार महाराष्ट्रातील शेतकरी शेतकऱ्यांना शेतात सिंचन करण्यासाठी सौरपंप उपलब्ध करून देईल. नवीन सौरपंप बसवण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून अनुदान दिले जाईल. राज्यातील शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरावी, शाश्वत व्हावी तसेच राज्यातील शेतकरी संपन्न आणि सुखी व्हावा असे महाराष्ट्र शासनाचे उद्दिष्ट आहे, यासाठी महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना, धोरणे नियोजनबद्ध पद्धतीने राबवीत असते, याच धोरणाचा अवलंब करून शेततळे योजना, सौर कृषी पंप योजना या सारख्या योजना शासन राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून या योजनांची अंमलबजावणी करत आहे. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप आस्थापित करण्याची योजना जाहीर केली आहे, सौर उर्जा हा उर्जेचा शाश्वत आणि अखंड स्त्रोत आहे, भारतासारख्या देशामध्ये आठ महिने कडक उन असते, त्यामुळे निसर्गाकडून मिळालेल्या या निरंतर उर्जेच्या स्त्रोताचा वापर सौर कृषी पंपच्या माध्यमातून वापरून शेतीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायद्याचा ठरू शकतो.

राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सौरपंप उपलब्ध करून देण्यात येणार असून जुन्या डिझेल इलेक्ट्रिक पंपांचे सौर पंपामध्ये रूपांतर करण्यात येणार आहे.

तर मित्रांनो, तुम्हालाही सौर कृषी पंप योजना महाराष्ट्राचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख पूर्ण वाचा. कारण आजच्या लेखात मी तुम्हाला Maharashtra Mukhyamantri Saur Krishi Pump Yojana महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 विषयी संपूर्ण माहिती जसे या योजनेच्या अंतर्गत अनुदान किती मिळणार, त्यासाठी पात्रता काय आहे, आवश्यक कागदपत्र इत्यादी माहिती पाहणार आहोत.महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023ची संपूर्ण माहिती सविस्तरपणे सांगणार आहे.

महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना या योजनेची अंमलबजावणी शासनाव्दारे राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केली आहे, तसेच शेतकरी वापरत असलेले पारंपारिक विजेवर चालणारे कृषी पंपांना पुरवठा होत असलेल्या विद्युत पुरवठ्यामध्ये वारंवार बिघाड होऊन वीज पुरवठा खंडित होणे, तांत्रिक वीज हानी वाढणे, रोहोत्र बिघाड होण्यामध्ये वाढ, विद्युत अपघात, विद्युत चोरी या सारख्या समस्यांमुळे अखंडित शाश्वत विद्युत पुरवठा होण्यास अडचणी निर्माण होतात, या शिवाय जिथे विद्युत पुरवठा उपलब्ध नाही अशा ठिकाणी शेतकरी डिझेल इंधनाचा वापर करून कृषी पंप चालवितात जे त्यांना डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे अत्यंत महागात पडते, पर्यायाने या सर्व समस्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होते, याला पर्याय म्हणजे सौर कृषी पंप राज्यातील शेतकऱ्यांना सौर कृषी पंप उपलब्ध करून दिल्यास वरील सर्व समस्यांवर मात करता येऊ शकते. यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 मोठ्याप्रमाणात राबविण्याचा शासनाचा विचार आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र ही अटल सौर कृषी पंप योजना म्हणूनही ओळखली जाते. या योजनेंतर्गत महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना एक लाख कृषी पंप देण्याचा निर्णय घेतला आहे. 31 जानेवारी 2019 पूर्वी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री सौरपंप योजनेंतर्गत लाभार्थ्यांची यादी जाहीर केली आणि त्यानंतर फेब्रुवारी 2019 च्या पहिल्या आठवड्यापासून सौरपंप बसविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 उद्दिष्ट : Mukhyamantri Saur Krishi Pump Yojana objective's

तुम्हाला माहिती आहे की आजही असे अनेक शेतकरी आहेत जे आपल्या शेतात डिझेल आणि इलेक्ट्रिक पंपाने सिंचन करतात, ज्यामध्ये ते खूप खर्च करतात कारण डिझेल पंप खूप महाग आहेत. ही समस्या लक्षात घेऊन राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहेमहाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सिंचन करण्यासाठी सौर पंप उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सौरपंप योजनेअंतर्गत राज्य सरकार पंपाच्या किमतीच्या ९५% अनुदान देते. लाभार्थी फक्त 5% भरतील. महाराष्ट्र सोलर पंप योजना 2023 द्वारे सौरपंप मिळाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होईल आणि त्यांना बाजारापेक्षा जास्त किमतीत पंप खरेदी करावे लागणार नाहीत. या सौरपंपांच्या उपस्थितीमुळे पर्यावरणाचे प्रदूषण होणार नाही.

महाराष्ट्र राज्यात हि योजना राबवीत असतांना विशेषतः विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये तसेच अतिदुर्गम भागांमधील शेतकऱ्यांसाठी राबविली जाणार आहे. त्यामुळे या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांनी भरावयाचा हिस्सा कमीत कमी ठेऊन उर्वरित रक्कम वित्तीय संस्थेमार्फत कर्ज स्वरुपात देण्यात येईल आणि या कर्जाची परतफेड महावितरण कंपनीव्दारे टप्प्या टप्प्याने करण्यात येईल. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांचा हिस्सा सर्वसाधारण लाभार्थ्यांकारिता सौर कृषी पंपांच्या केंद्रीय आधारभूत किंमतीच्या 10 टक्के आणि अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना 5 टक्के हिस्सा राहील.

[अवश्य वाचा: मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना महाराष्ट्र 2023 | Agriculture and Food Processing Scheme Maharashtra 2023|  ]

महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 लाभ : Mukhyamantri Saur Krishi Pump Yojana benefits

महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि मोलाची योजना मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना सुरु केली आहे, या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनासाठी कमीत कमी दारात सौर कृषीपंप शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेचे लाभ खालीलप्रमाणे आहेत.

मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना होणार आहे, या योजनेच्या अंतर्गत विद्युत कृषीपंपांच्या जागेवर सौर कृषीपंप उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

योजने अंतर्गत शासनाकडून सौर कृषी पंपांवर सबसिडी देण्यात येणार आहे, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत महाराष्ट्र सरकार सौर कृषी पंपाच्या किंमतीच्या 95 टक्के सबसिडी देणार आहे आणि यामध्ये लाभार्थ्यांना 5 टक्के रक्कम भरावयाची आहे.

या योजनेमुळे सौर कृषी पंपांमुळे पर्यावरण संरक्षणाचे उद्दिष्ट साध्य होणार आहे

योजने अंतर्गत पाच एकर पर्यंत शेत जमीन असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना तीन HP पंप देण्यात येईल आणि त्यापेक्षा जास्त शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना पाच HP पंप देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेच्या पहिल्या टप्प्यात शासनाकडून 25 हजार सौर कृषिपंपांचे वितरण करण्यात येणार आहे, आणि दुसऱ्या टप्प्यात 50 हजार सौर कृषीपंपांचे वितरण केले जाईल आणि तिसऱ्या टप्प्यात शासनाकडून शेतकऱ्यांना 25 हजार सौर कृषीपंपांचे वितरण करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना अंतर्गत  राज्यातील ज्या शेतकऱ्यांकडे आधीच विद्युत कनेक्शन आहे, त्या शेतकऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत सौर उर्जेवर चालणारे AG पंपांची सुविधा दिली जाणार नाही.

हि योजना ऑनलाइन असल्यामुळे अर्जदार या योजनेमध्ये अर्ज कधीह आणि कोठूनही करू शकतात, त्यामुळे योजनेत ऑनलाइन पद्धतीने अर्ज केल्यामुळे अर्जदाराचा वेळ वाचेल.

या योजने अंतर्गत शेतकऱ्यांचे जुने डिझेल पंप बदलून त्याजागी नवे सौर कृषी पंप बसविण्यात येणार आहे त्यामुळे वातावरणातील प्रदूषण कमी होऊन पर्यावरण संरक्षण होईल, तसेच मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनेमुळे विद्युत विभागावरचा वीज वितरणाचा अतिरिक्त भार कमी होण्यास मदत होईल.

मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेमुळे शासनाकडून शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिल्या जाणाऱ्या वीज अनुदानाचा शासनावरचा बोजाही कमी होण्यास मदत होईल.

या योजनेमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान कमी होण्यास मदत होईल त्यामुळे शेतीमध्ये उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल पर्यायी शेतकरी संपन्न होईल.

मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना 2023 अंमलबजावणी प्रक्रिया:

सौर कृषी पंप योजना राज्यात महावितरणकडून प्रामुख्याने जिल्हाधिकारी, महाउर्जा, सामाजिक न्याय विभाग, आदिवासी विकास विभाग, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, जिल्हा कृषी अधिकारी इत्यादी यांच्या समन्वयाने राबविण्यात येईल. या योजनेची प्रसिद्धी महावितरणव्दारे करण्यात येईल.

 या योजनेतील सौर कृषी पंपांसाठी शासनाव्दारे निर्धारित केलेल्या निकषानुसार आणि उद्दिष्टांच्या मर्यादेत लाभार्थ्यांची निवड जिल्हास्तरीय समितीव्दारे करण्यात येईल. समितीने शिफारस केलेल्या पात्र लाभार्थ्यांकडून सौर कृषीपंप बसविण्यासाठी आवश्यक लाभार्थी हिस्सा महावितरणच्या संबंधित जिल्हास्तरीय कार्यालयात जमा करावा.

राज्य शासनाव्दारे सुरु करण्यात आलेल्या एचव्हीडीएस योजनेंतर्गत जेथे वीज पुरवठा करण्याकरिता पायाभूत खर्च हा 2.5 लाख पेक्षा जास्त आहे तेथे वीज ग्राहकांना सौर कृषीपंप प्राधान्याने देण्यात यावा, या योजने अंतर्गत लागणाऱ्या सौर कृषी पंपांकरिता खुल्या निविदा प्रक्रीयेव्दारे महावितरणकडून करण्यात यावे. लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पंपांकरिता कार्यादेशहि महावितरणतर्फे पुरवठादारास देण्यात यावेत.

या योजनेंतर्गत सौर कृषीपंप आस्थापित करण्यासाठी दर निश्चित करून महसुली विभागवार पुरवठादारांचे पॅनल तयार करण्यात येईल, शेतकऱ्यांना या पॅनल मधील कोणत्याही एका पुरवठादारांकडून सौर कृषीपंप आस्थापित करता येऊ शकेल याबाबत शेतकऱ्यांना निवड स्वातंत्र्य राहील, हि बाब योजनेची अंमलबजावणी करतांना अवलंबण्यात येईल.

त्याचप्रमाणे सौर कृषीपंप आस्थापित करतांना जे पेड पेंडिंग शेतकरी आहेत त्यांना सौर कृषीपंप वितरण करण्यात प्राधान्य देण्यात येईल त्यांनी महावितरणकडे भरलेली अमानत रक्कम लाभार्थी हिश्यासोबत समाविष्ट करण्यात येईल.

नवीन नवीकरणीय उर्जा मंत्रालय, भारत सरकार यांनी निर्धारित मार्गदर्शक तत्वानुसार सौर कृषीपंपांचे तांत्रिक मानदंडानुसार बनविण्याची जबाबदारी महावितरणची राहील. तसेच योजनेच्या गुणवत्ता नियंत्रणाची जबाबदारी महावितरणची राहील.

महावितरणव्दारा निश्चित तांत्रिक मानदंडानुसार सोलर मोड्यूल्स हे भारतीय बनावटीचे आय..सी. (IEC) प्रमाणित किंवा तत्सम राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय मनांकनानुसार प्रमाणित तसेच आर.एफ.आय.डी (RFID) टॅग सुविधेसह पुरविणारे पुरवठादार असावेत. याबाबत महावितरणव्दारा साहित्य पुरवठादार कंपनीमध्ये साहित्याची तांत्रिक मानदंडानुसार पाहणी करून साहित्यांच्या योग्यतेबाबत खात्री करेल.

सौर कृषी पंपांचा हमी कालावधी हा पाच वर्षाचा असणे सोलर मोड्यूल्सची वॉरंटी 10 वर्षाची असणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक अटींची कंत्राटामध्ये समावेश करण्यात येईल तसेच सौर कृषी पंपांसाठी पुरवठादारांकडून 5 वर्षासाठीचा सर्वांकष देखभाल दुरुस्ती करार महावितरणकडून नोंदणीकृत करून घेण्यात येईल.

सौर कृषी पंप आस्थापित झाल्यानंतर तो संबंधित लाभार्थ्यास हस्तांतरित करण्यात येईल. त्यानंतर त्याची दैनंदिन देखभाल देखरेख करण्याची जबाबदारी संबंधित लाभार्थ्यांची राहील.

सौर कृषी पंप आस्थापित झाल्यानंतर त्याची आस्थापना कार्यन्वित अहवाल अधीक्षक अभियंता, महावितरण यांच्याकडून महावितरण कार्यालयाच्या मुख्यालयास सादर करण्यात येईल.

वित्तीय सहाय्याच्या रकमेची मागणी करून सदर निधी प्राप्त करून घेण्याची जबाबदारी महावितरणची असेल.

आस्थापित करण्यात आलेल्या सौर कृषी पंपांची तांत्रिक तपासणी महावितरणामार्फत करण्यात येईल.

या योजनेची अंमलबजावणी करतांना त्यासाठी आवश्यक असणारे अर्जाचे विहित नमुने, आस्थापना अहवाल, उपयोगिता प्रमाणपत्र संबंधित बाबी तांत्रिक तपासणी नमुना इत्यादी महावितरणामार्फत निर्गमित करण्यात येतील.

या योजनेचे आवश्यक लेखे महावितरणामार्फत ठेवण्यात येतील.

राज्य शासनाच्या इतर आर्थिक स्त्रोतातून महावितरणामार्फत प्राप्त होणाऱ्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र भौतिक आर्थिक अहवाल वेळोवेळी सादर करेल.

[अवश्य वाचा: कुसुम सोलर पंप योजना 2023 | वेबसाईट काही काळासाठी बंद ! कधी होणार चालू ? Kusum solar pump yojna 2023  ]

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत वर्गवार लाभार्थ्यांचा हिस्सा:

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने मध्ये सर्वसाधारण लाभार्थी आणि अनुसूचित जाती जमाती यांनी भरावयाचा हिस्सा खालीलप्रमाणे राहील.

लाभार्थी

3 HP पंप लाभार्थी हिस्सा

5 HP पंप लाभार्थी हिस्सा

7.5 HP पंप लाभार्थी हिस्सा

सर्वसाधारण लाभार्थी

16,560/- रुपये (10 %)

24,710/- रुपये (10%)

33,455/- रुपये (10%)

अनुसूचित जाती

8,280/- रुपये (5%)

12,355/- रुपये (5%)

16,728/- रुपये (5%)

अनुसूचित जमाती

8,280/- रुपये (5%)

12,355/- रुपये (5%)

16,728/- रुपये (5%)

महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना 2023 वैशिष्ट्ये (Features):

महाराष्ट्र राज्यात अटल सौर कृषीपंप योजना राबविण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयासमवेत राज्य शासनाव्दारे राज्यात एक लाख सौर कृषीपंप आस्थापित करण्यासाठी विभागाच्या अर्थसंकल्पीय तरतूद अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती लाभार्थ्यांकरिता विशेषघटक योजना / आदिवासी उपयोजनांतर्गत निधीचा वापर करून नवीन सौर कृषी पंप योजना करण्यास मान्यता दिली आहे. शेतकऱ्याला दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे त्याचप्रमाणे राज्य शासनाची पारंपरिक पद्धतीने कृषिपंप जोडणीसाठी लागणाऱ्या खर्चात आणि राज्य शासनाव्दारे सबसिडीपोटी देण्यात येणाऱ्या अनुदानात बचत करण्याचे उद्दिष्ट साध्य व्हावे याकरिता राज्यातील शेतकऱ्यांना कृषी सिंचनासाठी एक लाख सौर कृषी पंप टप्प्या टप्प्यात उपलब्ध करून देण्याचा शासनाचा उद्देश आहे.

 

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना हि संपूर्णपणे महाराष्ट्र शासनाची योजना आहे, या योजनेच्या अंतर्गत पुढील तीन वर्षाच्या कालावधीत टप्प्या टप्प्याने एक लाख सौर कृषीपंप आस्थापित करण्याचा शासनाचा उद्देश आहे. या योजनेच्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात 25000 सौर कृषी पंप, दुसऱ्या टप्प्यात 50000 सौर कृषी पंप आणि तिसऱ्या टप्प्यात 25000 सौर कृषी पंप आस्थापित करण्याचे उद्देष्ट ठरले आहे. या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक टप्पा प्रत्यक्ष सुरु झाल्यापासून अठरा महिन्यात राबविण्यात येईल.

 

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत महाराष्ट्र सरकार सौर कृषी पंपाच्या किंमतीच्या 95 टक्के अनुदान देणार आहे आणि यामध्ये लाभार्थ्यांना 5 टक्के रक्कम भरावयाची आहे.

या योजने अंतर्गत 5 एकरपर्यंत शेतजमीन असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना 3 HP पंप देण्यात येतील आणि 5 एकर पेक्षा अधिक शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना 5 HP आणि 7.5 HP पंप देण्यात येतील.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनेचं अंतर्गत राज्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल.

महाराष्ट्र सौर कृषी पंप योजना 2023 लाभार्थी पात्रता :

महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना 2023 मोठ्याप्रमाणात राबविण्यात येणार आहे त्यामुळे या योजनेसाठी शासनाने लाभार्थ्यांसाठी पात्रता निकष ठरवून दिलेले आहे, शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी हे पात्रता निकष माहित असणे आवश्यक आहे, या योजनेचे पात्रता निकष खालीलप्रमाणे असतील

 

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा लाभ मिळविण्यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध आहे, असे सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील, परंतु या शेतकऱ्यांकडे पारंपारिक पद्धतीने विद्युत कनेक्शन नसणे आवशयक आहे.

या योजने अंतर्गत पाच एकरापर्यंत शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना तीन HP सौर कृषी पंप आणि पाच एकरांपेक्षा जास्त शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना पाच HP सौर कृषी पंप देण्यात येतील.

या योजनेच्या अंतर्गत राज्यातील पारंपारिक पद्धतीने विद्युत कनेक्शन नसलेले शेतकरी तसेच विद्युतीकरणासाठी वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसलेले शेतकरी, महावितरण कंपनीकडे विद्युत कनेक्शनसाठी पैसे भरूनही प्रलंबित असणाऱ्या शेतकऱ्यांपैकी, ज्यांना नजीकच्या काळात विद्युत कनेक्शन मिळणे शक्य नाही असे शेतकरी, अतिदुर्गम भागातील शेतकरी, महाराष्ट्र शासनाच्या धडक सिंचन योजने अंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी यांना सदर योजने अंतर्गत प्राधान्य राहील.

वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, बारमाही वाहणारी नदी किंवा नाले यांच्या शेजारी शेतजमीन  असणारे शेतकरी सुद्धा या योजनेसाठी पात्र असतील.

योजनेच्या अंतर्गत सौर कृषी पंपांसाठी सर्वसाधारण गटांच्या लाभार्थ्यांकडून 10 टक्के आणि अनुसूचित जातीच्या अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकडून 5 टक्के याप्रकारे लाभार्थी हिस्सा म्हणून भरणे आवश्यक असेल.

[अवश्य वाचा:लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2023| Lek Ladki Yojana Maharashtra Online Apply 2023   ]

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना 7.5 HP सोलर पंपांसाठी लाभार्थी पात्रता :

विहीर किंवा कुपनलिका यापैकी जलस्त्रोत असणे आवश्यक आहे.

अद्यावत भूजल अंदाज अहवालानुसार अतिशोषित, शोषित, आणि अंशतः शोषित गावांमधील विहिरींमध्ये कूपनलिकांमध्ये नवीन सौर कृषीपंप अनुज्ञेय असणार नाही.

अद्यावत भूजल अंदाज अहवालानुसार ज्या सुरक्षित पाणलोट क्षेत्रांची उपसाची स्थिती 60 टक्के पेक्षा कमी आहे, अशा क्षेत्रातील गावांमधील विहिरींमध्ये कूपनलिकांमध्ये नवीन सौर पंप देण्यात येतील.

खडकाळ क्षेत्रांमध्ये खोदल्या जाणाऱ्या बोरवेल विहिरी हे सिंचनाचे शाश्वत साधन नसल्याने बोरवेल विहिरींमध्ये नवीन सौर पंप देणे अनुज्ञेय असणार नाही. परंतु गाळाच्या क्षेत्रांमध्ये खोदल्या जाणाऱ्या कुपनलिका हे शाश्वत सिंचनाचे साधन असल्यामुळे सुरक्षित क्षेत्रांमध्ये कूपनलिकांमध्ये नवीन सौर पंप देण्यात येतील.

कोणत्याही वर्गवारीतील क्षेत्रांमध्ये 60 मीटर पेक्षा जास्त खोल असलेल्या विहिरींमध्ये अथवा कूपनलिकेमध्ये नवीन सौर पंप देण्यात येणार नाही.

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना 3 HP आणि 5 HP सोलर पंपांसाठी लाभार्थी पात्रता :

शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्त्रोत असलेली शेतजमीन असणे आवश्यक आहे.

पारंपारिक पद्धतीने कृषि पंपांकरिता विद्युत जोडणी झालेले शेतकरी.

पाच एकरापर्यंत शेतजमीन धारकास 3 HP सौर कृषीपंप 5 एकरापेक्षा जास्त शेतजमीन धारकास 5 HP आणि 7.5 HP सौर कृषिपंप देय राहील.

यापूर्वी शासनाच्या कुठल्याही योजनेव्दारे कृषी पंपांचा लाभ घेतलेले शेतकरी

अतिदुर्गम आदिवासी भागातील शेतकऱ्यास प्रधान्य.

वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याने अद्याप विद्युतीकरण झालेल्या गावातील शेतकरी.

धडक सिंचन योजना अंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी.

महावितरणाकडे विद्युत कनेक्शनसाठी पैसे भरून प्रलंबित असलेले शेतकरी अर्जदार.

[अवश्य वाचा: free solar rooftop yojana 2023| मोफत सोलर रूफटॉप योजना 2023  ]

महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 आवश्यक कागदपत्र :

या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी योजनेमध्ये अर्ज करणे आवश्यक आहे, त्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी खालीलप्रमाणे राहील.

 

अर्जदाराचे आधार कार्ड

शेतीचे कागदपत्र

मूळ निवासाचे प्रमाणपत्र

बँक पासबुक

मोबाईल नंबर

ओळख पत्र

पासपोर्ट साईज फोटो

7 / 12 उतारा

मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना 2023 ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया :

या योजनेच्या अंतर्गत लाभ मिळविण्यासाठी ऑनलाइन https://www.mahadiscom.in/solar/index.html  या वेबसाईटवर जाऊन अर्ज करणे आवश्यक आहे, या योजनेमध्ये ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.

महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना अंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम राज्यातील महावितरणच्या आधिकारिक वेबसाईटवर भेट द्यावी लागेल

यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होम पेज उघडेल या होम पेजवर तुम्हाला Beneficiary Services हा पर्याय दिसेल, यावर क्लिक करावे लागेल

त्यानंतर दिलेल्या पर्यायांमधून ‘’Apply Online’’ या पर्यायावर क्लिक करा, यानंतर तुमच्यासमोर ‘’New Consumer’’ हा पर्याय दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल

या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल या पेजवर एक नवीन अर्ज उघडेल.

या अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हला भरायची आहे या प्रमाणे :-

Paid Pending AG Connection Consumer Details:

शेतकऱ्याने जर विद्युत कनेक्शनसाठी पैसे भरून अद्यापही वीज जोडणी झाली नसे तर त्या विषयी माहिती भरावी.

Details Of Applicant And Location :

त्यानंतर अर्जदाराने आधार कार्ड प्रमाणे संपूर्ण माहिती आणि जागेचा तपशील भरावा 

Nearest MSEDCL Consumer Number :

तुम्हाला यानंतर ज्या शेतजमिनीवर सौर पंप बसविण्याचा आहे त्या शेतीबद्दल संपूर्ण माहिती भरावी लागेल. तसेच तुम्हाला जवळचा महावितरण ग्राहक क्रमांक द्यावा लागेल.

Details Of Applicant Residential Address And Location :

या नंतर तुम्हाला तुमच्या घराचा संपूर्ण पत्ता आणि ठिकाणाबद्दल माहिती भरावी लागेल

वरीलप्रमाणे संपूर्ण माहिती तुम्हाला भरावयाची आहे.

आता यानंतर अर्जामध्ये मागितलेले सर्व कागदपत्रे तुम्हाला अपलोड करावी लागेल, त्यानंतर संपूर्ण माहिती भरल्यानंतर पुन्हा एकदा संपूर्ण पडताळणी करा.

यानंतर सबमिट बटनावर क्लिक करून अर्ज सबमिट करा, या प्रकारे तुमची योजनेमध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना अर्ज स्थिती तपासणे :

तुम्ही महावितरणच्या अधिकृतवेबसाईटवर जाऊन तुमच्या अर्जाची स्थिती खालीलप्रमाणे तपासू शकता.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेच्या अंतर्गत केलेल्या अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला महावितरणच्या आधिकारिक वेबसाईटवर जावे लागेल.

तुमच्यासमोर उघडलेल्या मुखपृष्टावर तुम्हाला ‘’लाभार्थी सेवा’’ हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

आता तुम्हाला दिलेल्या पर्यायांमधून ‘’Track Application Status’’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल, आता या नवीन पेजवर तुम्हाला अर्जाची स्थिती पाहण्यासाठी ‘’लाभार्थी आयडी’’ भरावा लागेल.

यानंतर तुम्हाला सर्च या पर्यायावर क्लिक करावे लागेल, या पर्यायावर क्लिक केल्यावर आपल्यासमोर संबंधित अर्जाची स्थिती दिसेल.

शेतकऱ्यांसाठी शेती हा फायदेशीर व्यवसाय व्हावा, शेती हि शाश्वत व्हावी आणि पर्यायाने शेतकरी संपन्न व्हावा या साठी शासनाकडून विविध प्रकारच्या योजना राबविल्या जात आहे, याचे पुढील पाऊल म्हणजे शासनाव्दारे शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेली मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना या योजनेमुळे जिथे वीज उपलब्ध नाही अशा अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांना शेती सिंचन करणे सुलभ होणार आहे, तसेच डिझेल पंपामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान कमी होण्यास मदत होईल. अपारंपरिक उर्जास्त्रोतांमध्ये सौरउर्जा हि शाश्वत आणि निरंतर आहे. पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने, वातावरणातील प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचे नुकसान कमी होऊन त्यांचे उत्पन्न वाढावे या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेच्या माध्यमातून एक लाख सौर कृषीपंप उपलब्ध करून देण्याचे लक्ष निर्धारित केले आहे. वाचक मित्रहो या लेखामध्ये आपण मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहिली आहे, तरीही या योजनेविषयी आपल्याला आणखी काही माहिती जाणून घ्यायची असल्यास खाली दिलेल्या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधून माहिती मिळवू शकता

सौर कृषीपंप योजना हेल्प लाईन क्रमांक: 1800 102 3435 / 1800 233 3435

सौर कृषीपंप योजना ऑफिशियल वेबसाईट :                                                    

 https://www.mahadiscom.in/solar/index.html


महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना 2023 FAQ


Q. मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना काय आहे ?

 -महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार राज्यातील शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी सौर कृषी पंप उपलब्ध करून देणार आह, जेणेकरून शेतकऱ्यांसाठी सिंचनाची सुविधा निर्माण होईल आणि पर्यायी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.

 Q. सौर कृषीपंप म्हणजे काय ?

 -सौर पंप म्हणजे सौर उर्जेवर चालणारे पंप, यामध्ये फोटोव्होल्टाइक्स (PV) पॅनलव्दारे निर्माण होणाऱ्या विजेवर चालणारे पंप, पारंपारिक विजेवर किंवा डिझेलवर चालणाऱ्या पंपांच्या विरुद्ध हे पंप सूर्यप्रकाशापासून निर्माण होणाऱ्या विजेवर म्हणजेच थर्मल उर्जेवर काम करतात. सर्वसाधारणपणे सौर उर्जेवर चालणाऱ्या पंपांमध्ये सोलर पॅनल, सोलर चार्ज कंट्रोलर, डी.सी. वॉटरपंप इत्यादी उपकरण असतात.

 Q. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना किती पैसे भरायचे आहे ?   

 -मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना अंतर्गत शासनाव्दारे 95 टक्के अनुदान देण्यात येणार आहे आणि यामध्ये लाभार्थ्यांना 5 टक्के हिस्सा भरावा लागेल.

 Q. मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना कोणत्या राज्यात लागू केली आहे ?

 -महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि मोलाची योजना मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना सुरु केली आहे.

 Q. महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेची अर्ज प्रक्रिया काय आहे ?

 -महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन माध्यमातून केली जाते. यासाठी महावितरणच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन योजनेसाठी अर्ज करावा  लागतो.

  Q. सौर कृषीपंप योजना हेल्प लाईन क्रमांक काय आहे ?

-1800 102 3435 / 1800 233 3435


[अवश्य वाचा: ऑनलाइन फॉर्म: महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023: Maharashtra Solar Pump Yojana 2023 ]


 [अवश्य वाचा: शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना 2023 | farmers government scheme 2023 ]


[अवश्य वाचा: शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2023 संपूर्ण माहिती! | Sharad pawar gram samridhi yojana 2023 ]




Tags :-

Maharashtra Mukhyamantri Saur Krishi Pump Yojanaअटल सौर कृषी पंप योजनाऑनलाइन सोलर पंप रजिस्ट्रेशनमहाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अर्ज स्थितीमुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना PDFसौर ऊर्जा ऑनलाइन फॉर्म PDF, Mukhyamantri Saur Krishi Yojana, #pm kusum yojana, #sour pump yojna, 

#kusum mahaurja.com solar beneficiary registration,

#kusum mahaurja.com login,

#mukhyamantri sour krushi pumpm yojna 2023 form appliacation,

#kusum sour pump yojna,

#kusum mahaurja solar register.com

#Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana 2023 Registration

#Atal sour krushi pump,beneficiary.login

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने